मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी काशीळ, ता. सातारा येथील एका शाळेतील मुख्याध्यापक संजय प्रतापराव जाधव (वय 53, मूळ रा. नांदगाव सध्या रा. संभाजीनगर, सातारा) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन.एल. मोरे यांनी पाच वर्षांची सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, तो न भरल्यास दोन महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, ही घटना 2016 रोजी घडली असून बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 9 ऑक्टोबर 2016 रोजी काशीळ येथील एका शाळेत घडली आहे. अल्पवयीन 12 वर्षांची मुलगी शाळेत गेली होती. त्यावेळी शाळेतील संगणक वर्गातील लाईट अचानक गेल्यानंतर अंधार पडला.
गुन्ह्याचा तपास करून सपोनि एन. आर. चौखंडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात याप्रकरणी सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर बचाव व सरकार पक्षाच्यावतीने जोरदार युक्तिवाद झाला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी मुख्याध्यापक संजय जाधव याला सोमवारी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील अॅड. एन.डी. मुके यांनी काम पाहिले.
दरम्यान, मुख्याध्यापकाला शिक्षा लागल्याची माहिती समोर आल्यानंतर सातार्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज