mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीने ‘रमाई आवास’ योजनेची वाळू गेली पाण्यात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीने ‘रमाई आवास’ योजनेची वाळू गेली पाण्यात


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला सन 2021 पर्यंत हक्काचे आणि पक्के घर देण्याचा संकल्प केला असून त्या माध्यमातून घरकूल बांधण्याच्या अनेक योजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यांपैकी मागासवर्गीयांसाठी असणार्‍या ‘रमाई आवास’ योजनेला मोफत पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, सोलापूर जिल्ह्यात तहसीलदार आणि गटविकास अधिकार्‍यांच्या टोलवाटोलवीने हजारो मागासवर्गीय बांधवांच्या घरकुलांचे स्वप्न धूसर झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना ‘रमाई आवास’ योजनेंतर्गत घरकूल देण्याची योजना आहे.

मात्र, सध्या जिल्ह्यासह राज्यात वाळूचा तुटवडा असल्याने शासनानेच यासाठी गरिबांच्या घरकूल योजनेला अडथळा येऊ नये यासाठी शासन निर्णय काढला होता. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्याला घरकुलासाठी किमान पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय जारी केला होता. मात्र, याची अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्यात झालीच नाही. यासाठी अनेक लाभार्थ्यांनी तसेच सामाजिक संस्थांनी गटविकास अधिकारी आणि संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांशी पत्रव्यवहार केला असला तरी प्रत्यक्षात हे काम झालेच नाही. त्यामुळे अनेकांच्या घरांचे स्वप्न अधुरे राहिले आहे.


दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यांचा विचार केला तर वाळू देण्यासाठी लाभार्थ्यांना परवानगीचे वाटप करण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्याला कुसूर, तर उत्तर सोलापूर तालुक्याला नंदूर येथील वाळू साठ्यातून वाळू उपलब्ध करुन देण्याचे धोरण ठरले होते. मात्र, तहसीलदारांनी हा प्रस्ताव बीडीओंकडे आणि बीडीओंनी पुन्हा तहसीलदारांकडे ढकलला. दोन्ही अधिकार्‍यांच्या या टोलवाटोलवीत वर्षे लोटली तरी अद्याप लाभार्थ्यांना वाळू मिळू शकली नाही. त्यामुळे हजारो मागासवर्गीय लोकांच्या स्वप्नातील घर अधुरे राहिले आहे. यामध्ये गटविकास अधिकार्‍यांनी लाभार्थ्यांची यादी तहसीलदारांना पाठवायची असून त्यांनी त्यांच्या घराच्या बांधकामाची स्थिती पाहून गरजेनुसार वाळू उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे.

यासाठी शासानाने शासन निर्णयही जारी केला आहे. असे असले तरी या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यात मात्र केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांवर सध्या वाळू मिळविण्यासाठी प्रचंड कसरत करण्याची वेळ आली आहे. वाळूचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मंजूर अनुदानात घरकुलाचे बांधकाम पूर्ण करणे लाभार्थ्यांसाठी मोठे दिव्य होऊन बसले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासाठी काही पावले उचलावीत, अशी अपेक्षा आता लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दोघांना पाच दिवसाची पोलिस कोठडी

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी दोघांना पाच दिवसाची पोलिस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा