मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पुण्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे . शनिवारी दिवसभरात आणखी तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शनिवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पुण्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या २९ झाली आहे तर आणखी २७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा २३६ वर गेला आहे.
दरम्यान,कोरोना व्हायरस रुग्णांच्या मृत्यूची संख्या मुंबई आणि पुण्यात वाढत आहे.त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासनाची काळजी वाढलेली आहे . यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडलेली आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज