mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार भारत भालकेंच्या प्रवेशाने मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला आधार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
आमदार भारत भालकेंच्या प्रवेशाने मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला आधार

मंगळवेढा : समाधान फुगारे

काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी सत्ताधारी पक्षात न जाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात काही प्रमाणात बॅकफूटवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू आणखी भक्कम झाली असल्याचे मानले जात आहे.

मागील अनेक दिवसांपासून आमदार भारत भालके हे काँग्रेसला सोडचिट्टी देवून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा वावड्या सुरु होत्या. परंतु रविवारी अखेर काँग्रेसची साथ सोडून आमदार भालकेंनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हातात घड्याळ बांधले. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापू्र्वीच आमदार भालकेंनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

आमदार भारत भालकेंनी 2004 साली पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेची निवडणुक माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात लढवली होती. त्यावेळी भालके पराभूत झाले होते. त्यानंतर 2009 साली दुसऱ्यांदा रिडालोसकडून राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांनी मोहिते पाटलांचा दारुन पराभव केला होता.

2014 च्या निवडणुकीत विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात आमदार भालकेंनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून परिचारकांचा सुमारे आठ हजार मतांनी पराभव केला होता. आमदार भालके भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असताना त्यांनी अचानक राष्ट्रवादीकडून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता पर्यंतच्या तिन्ही विधानसभा निवडणुकीत आमदार भालकेंनी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणुक लढवली आहे.या निवडणुकीत त्यांना थेट माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या विरोधात लढावे लागणार आहे. 

सुधाकर परिचारक हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. तर आमदार भालकेंची देखील राजकारणात कसलेला पैलवान म्हणून ओळख आहे. विधानसभेच्या आखाड्यात कोण कशी मात करुन निवडणुकीचा फंड जिंकतो याकडेच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार भारत भालके यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा निर्णय त्यांनी जनतेवर सोपवला होता. मात्र जनता हाच माझा पक्ष म्हणत हा निर्णय त्यांनी स्वतःकडे घेतला होता. भालके हे नेमके कोणात्या पक्षात प्रवेश करणार, या विषयी तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भालकेंच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीची बाजू आणखी बळकट झाली असल्याचे मानले जात आहे.

आमदार भालकेंच्या राजकारणाला आता, राष्ट्रवादीची जोड मिळाल्याने तूर्तासतरी भालकेंचाच बोलबाला राहणार असून, येत्या काळात मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघातील हा संघर्ष कमालीच्या चुरशीचा राहताना, लोकांमध्ये याबाबत कुतूहल, उत्सुकता, उत्कंठता राहील हे निश्चित.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात रात्री घरावर पडतात दगडे, नागरिक भयभीत

मंगळवेढ्यात रात्री घरावर पडतात दगडे, नागरिक भयभीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांची राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

हार-शाल नव्हे, आता ‘झाड’ भेट द्या! ‘सावली निवास’वर रंगणार माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सरांचा पर्यावरणपूरक वाढदिवस सोहळा; निसर्गाला प्राणवायू देण्याचा कार्यकर्त्यांचा मोठा संकल्प

May 17, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढणार; ‘या’ तारखेपासून करणार आमरण उपोषण

May 17, 2026
सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या रेल्वे मार्गाची गरज; शेतकऱ्यांना होणार ‘हा’ मोठा फायदा

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! विमानासारखं सीट बुकिंग आणि ५ पटीने जास्त स्पीड; काय आहे रेल्वेचा नवा प्लॅन? रेल्वे प्रवासात मोठा बदल

May 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दहावीत ९१ टक्के! ‘अभ्यास कर’ म्हणणे एवढे झोंबले? नवीन मोबाईल आणल्यानंतर काही तासांतच १६ वर्षांच्या शिवमचा टोकाचा निर्णय

May 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

बँकेची दिशाभूल करण्यासाठी एक थक्क करणारा देखावा; रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, दारू पाजून मित्रालाच संपवलं; 8 महिन्यानंतर थरारक घटनेचा उलगडा

May 17, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधानपरिषदेचा धुराळा! सोलापूर महायुतीकडे, पण भाजपच्या कोट्यातून कोणाची लागणार लॉटरी? ‘या’ नावांची चर्चा; भाजपच्या गोटात हालचालींना वेग

May 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा