टीम मंगळवेढा टाईम्स । गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये लिटर अनुदान व दूध पावडर ला प्रति किलो 50 रुपये अनुदानाच्या मागणी करता आज भारतीय जनता पार्टी महायुती चा दुध यलगार रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. BJP on the road for milk price Government Home Quarantine
महाराष्ट्र मधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे बँकेकडून नाकारला जाणारा कर्जपुरवठा नकली बियाणांमुळे करावी लागलेली दुबार पेरणी युरिया खताचा तुटवडा अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.
या कोरोनाच्या लॉकडाउनच्या च्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये 30 टक्केपर्यंत घट झाली शहरातील हॉटेल्स चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दूध संघाकडून 15 ते 16 रुपये दराने दूध खरेदी केले जात आहे या दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही शासनाने 10 लाख लिटर दूध पंचवीस रुपये प्रति लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती.
परंतु प्रत्यक्षात सात लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे.भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या सूचनेनुसार गाईच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान व दूध पावडर करिता प्रतिकिलो 50 रुपये अनुदान शासनाकडून कडून 30 रुपये प्रति लिटर दुधाची खरेदी या न्याय्य मागण्या करिता आज दूध एलगार रास्ता रोको आंदोलन होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज