mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 14, 2021
in राज्य
आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

टीम मंगळवेढा टाईम्स ।

बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीला भाजपाचा नेता धावला आहे. धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत, त्यामुळे पक्षातील सहकाऱ्यांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असं विधान पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केल्याने राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाऊ शकतो असंही म्हटलं जात आहे.तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने पुन्हा पोलीस ठाणे गाठलं, त्यावेळी पोलीस या प्रकरणात सहकार्य करत नसून तपास करणारी अधिकारी धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आहे असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलाने केला आहे.

त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याविरोधात कारवाई न करण्यासाठी दबाव आणला जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.याचवेळी धनंजय मुंडे यांच्या मदतीला भाजपाचा नेता धावला आहे. मुंबईतील भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आंबोली पोलीस ठाण्यात धनंजय मुंडेवर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत, त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

कृष्णा हेगडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रेणु शर्मा २०१० पासून माझ्यावर रिलेशिप ठेवण्यासाठी दबाव आणत होती, माझ्या सूत्रांकडून माहिती पडले की ही महिला हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे वसूल करते. मी या महिलेला दुर्लक्षित करत होतो. या महिलेने अनेकांना अशाप्रकारे लुबाडले आहे. मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच २०१५ पर्यंत ही महिला मला फोन कॉल, मेसेज करून भेटण्यासाठी बोलवत होती. परंतु मी टाळाटाळ करत होतो. मी स्पष्ट शब्दात रेणु शर्माला कोणत्याही प्रकारे संबंध ठेवणार नाही असं बजावलं होतं. ६ आणि ७ जानेवारीलाही तिने मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवले, मी इमोजीशिवाय अन्य काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

२ दिवसांपूर्वी या महिलेने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप लावल्याचं मी मीडियात वाचलं तेव्हा मला धक्का बसला. तेव्हा मी या महिलेविरोधात पोलीस तक्रार करण्याचं ठरवलं, आज ती महिला धनंजय मुंडे यांना टार्गेट करत आहे,

काही वर्षांपूर्वी मला करत होती उद्या भविष्यात अन्य कोणाला टार्गेट करू शकते, त्यामुळे या महिलेविरोधात सखोल चौकशी करून ब्लॅकमेलिंग, खंडणी आणि हनी ट्रपचा तपास करावा अशी मागणी कृष्णा हेगडे यांनी केली आहे.

एकीकडे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळत असताना दुसरीकडे मात्र भाजपाने सावध प्रतिक्रिया घेतली होती,

त्यात आता भाजपाच्या नेत्याने पुढे येऊन तक्रारदार महिलेविरोधात गंभीर आरोप केल्याने या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळणं लागलं आहे. यातच भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे प्रकरणी काय भूमिका घेतं हे पाहणं गरजेचे आहे.

कारवाई करण्याचे शरद पवारांचे संकेत

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप गंभीर आहेत, त्यांनी माझी भेट घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. हे प्रकरण कोर्टातही सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेली माहिती पक्षाच्या बैठकीत सर्व सहकाऱ्यांना सांगितली जाईल.

त्यानंतर पक्ष म्हणून जो निर्णय घ्यायचा आहे तो मी घेईन, कोणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे असं सांगत धनंजय मुंडे प्रकरणात कारवाई करण्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणतात…

“धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: यासंदर्भात कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी सांगितले.

तसेच, धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. यामुळे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानेही त्या कबुलीसंदर्भात विचार करणे आवश्यक आहे. यातील कायदेशीर बाब, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी या दोघांनीही मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचेही सांगितले आहे.

त्यामुळे, असे संशयाचे वातावरण राहणे योग्य नाही. पोलिसांनी या संदर्भातील सत्य तत्काळ बाहेर आणावे. एकदा सत्य बाहेर आले की, आम्ही आमची मागणी करू” असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

२०१९ पासून करूणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.

या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मी २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे.

या संदर्भात करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही असे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धनंजय मुंडेराष्ट्रवादी

संबंधित बातम्या

विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

सोलापूर विधानपरिषदेत भाजपचा मोठा डाव; प्रशांत परिचारकांना डावलून राजेंद्र राऊतांना उमेदवारी, परिचारक गट नाराज?

June 1, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

जमिनीच्या तुकड्यासाठी कोर्टाची पायरी चढणाऱ्यांनी एकदा वाचाच; वडिलांच्या निधनानंतर मुलांनी घराच्या अंगणातच केलं असं काही पंचक्रोशीतून होतंय प्रचंड कौतुक

June 1, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगेंनी लढाई जिंकली, उपोषण सोडलं; सरकारकडून मागण्या मान्य; अंतरवालीत मध्यरात्री काय घडलं?

May 31, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

ब्रेकिंग न्यूज! सोलापूर विधान परिषदेसाठी प्रशांत परिचारक फायनल? अधिकृत घोषणा बाकी; मात्र भाजपच्या ‘त्या’ नेत्याच्या एन्ट्रीने सस्पेन्स वाढला

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 30, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
Next Post
मंगळवेढ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

मंगळवेढ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

ताज्या बातम्या

चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळ! कर्नाटक हादरवणारे गोविंदपूर हत्याकांड; सिद्धापूर कनेक्शन’ उघड, पोलिसांकडून एका संशयिताला अटक

June 2, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! जन्म दाखल्याच्या ऑर्डरसाठी २ हजारांची लाच घेताना महसूल सहाय्यकाला रंगेहाथ पकडले

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! सरकारने दिली बळीराजांची चिंता वाढविणारी अपटेड; मान्सून लांबणार, पेरणीची घाई करू नका…

June 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा