टीम मंगळवेढा टाईम्स ।
लोकसभा निवडणूकीबाबत भालके गटाचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून जाहीर करणार असल्याचे भालके गटाचे नेते भगीरथ भालके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.
लोकसभा निवडणूकीच्या संदर्भात सोलापूर लोकसभा मतदार संघ व माढा लोकसभा मतदारसंघामध्ये तालुक्यातील पंढरपूर शहर व ३९ गावे सोलापूर मतदार संघाला जोडलेली आहे. तसेच माढा मतदार संघाला ५९ गावे पंढरपूर तालुक्यातील जोडलेली आहेत.
तसेच मंगळवेढा शहर व ८१ गावे सोलापूर लोकसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत. या दोन तालुक्यातील भालके गटाने लोकसभेच्या निवडणूकीसाठी कोणास मदत करावयाची यासाठी भगिरथ भालके यांच्या उपस्थितीत मंगळवेढा-सोलापूर रोड वरील कारखाना चौक हॉटेल रुद्र येथे सकाळी ११ वाजता प्रमुख कार्यकर्त्यांची विचार विनीमय बैठक आयोजित केली होती.
यावेळी भगिरथ भालके यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, येणाऱ्या लोकसभेसाठी कोणत्या पक्षाला मदत करावयाची याचा निर्णय मी आमच्या गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका येत्या तीन दिवसात पंढरपूर व मंगळवेढा येथे घेणार असून
आज शुक्रवार ५ एप्रिल रोजी विठ्ठल हॉस्टिल पंढरपूर येथे पंढरपूर शहर व पुर्वेकडील २२ गावे व मोहोळ तालुक्याला जोडलेली १७ गावे येथील कार्यकत्यांची विचारविनीमय बैठक घेणार असून उद्या शनिवार ६ एप्रिल रोजी माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील ४२ गावे व सांगोला तालुक्याला जोडलेली १७ गावे यांची बैठक देखील विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर येथे घेणार आहे.
तसेच रविवार ७ एप्रिल रोजी मंगळवेढा शहर व ८१ गावे येथील कार्यकर्त्यांची बैठक मंगळवेढा येथील कार्यालयात घेणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, साखर कारखान्याचे आजी माजी संचालक तसेच जेष्ठ कार्यकर्ते मंडळी यांच्या उपस्थितीत आमच्या गटाचा निर्णय झाल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांच्या समवेते एकत्र येवून संबंधीत पक्षाच्या उमेदवाराच्या हजेरीत प्रवेश करणार आहेत.
भालके गटाचे नेते भगिरथ भालके यांचा पोटनिवडणूकीत पराभव झाल्यानंतर तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये पराभवानंतर भगिरथ भालके बरेच दिवस नॉटरिचेबल होते. मात्र भारत राष्ट्र समिती (बी. आर.एस.) मध्ये गेल्या सहा महिन्यापुर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री व मंत्री मंडळाच्या उपस्थितीमध्ये बी. आर. एस. मध्ये जाहीर प्रवेश केला.
ते सध्या बीआरएस पक्षातच असल्याचे सांगत असून लोकसभेच्या निवडणूकीत ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार ? कोणास मदत करणार याबाबत राजकीय उत्सुकता लागली होती.
मात्र त्यांनी मंगळवेढा येथे बैठक घेवून सावध पवित्रा घेण्याचे संकेत दिल्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे मंगळवेढा व पंढरपूर येथील राजकीय पक्षांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
विकासासाठी, अडीअडचणी सोडवण्यासाठी भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस व आरोग्य मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्याशी अत्यंत जवळचे संबंधित भगीरथ भालके यांचे असुन मतदारसंघाच्या विकासासाठी, जनतेच्या अडीअडचणीसाठी भालके यांनी वेळोवेळी भेट घेऊन पाठपुरावा देखील केला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज