mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकरी कामगार यांचं समाधान होईल असे काम आम्ही करून दाखवणार; चेअरमन संजय आवताडे यांचा शब्द

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 21, 2022
in मंगळवेढा
शेतकरी कामगार यांचं समाधान होईल असे काम आम्ही करून दाखवणार; चेअरमन संजय आवताडे यांचा शब्द

टीम मंगळवेढा टाईम्स। 

आवताडे शुगर हा कारखाना शेतकऱ्यांच्या सहकार्यावर चालू हंगामात प्रतिदिन पाच हजार मे.टन ऊस गाळप करून हंगाम यशस्वी पध्दतीने पार पाडण्याचा निश्चय आम्ही केला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आवताडे शुगर कारखान्यास घालून सहकार्य करावे,

सर्व तोडणी ठेकेदार व कामगारांच्या सहकार्याने आम्ही हा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पार पाडणार असल्याचा विश्वास कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी व्यक्त केला.

आवताडे उदयोग समूहाने नुकताच खरेदी केलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टलरीज या कारखान्याचा “पहिला गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन” सोहळा ऊस उत्पादक शेतकरी आण्णाप्पा काकणगी व विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी उभयतांचे शुभहस्ते सत्यनारायण महापूजा करून बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.

याप्रसंगी बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी शुगरचे माजी व्हा. चेअरमन अंबादास कुलकर्णी, पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर,

मिस्टर सभापती सुधाकर मासाळ, माजी उपसभापती सुरेश ढोणे, कात्राळचे सरपंच विजय माने, भैय्या कळसे, सद्गुरूचे संचालक मोहन बागल, शांतीनाथ बागल,

महेश चव्हाण, शेखर भोसले, दादा ढोले, आबासाहेब पाटील, लक्ष्मण जगताप, युवराज शिंदे, प्रहारचे समाधान हेंबाडे, राजीव बाबर, शिवयोग्याप्पा पुजारी, बटू पवार, बसू पाटील,

पप्पू काकेकर, सचिन शिवशरण, सौ.स्मिता म्हमाणे यांचेसह माजी शिवसेना तालुका प्रमुख प्रा.येताळा भगत, सरोज काझी, प्रमोदकुमार म्हमाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आवताडे म्हणाले की, माझं बोलणं कमी व काम जास्त असतं कारखान्याला ऊस घालणारे सर्व शेतकरी कामगार यांचं समाधान होईल असे काम आम्ही करणार आहोत.

या कारखान्याची पाच हजार मे.टन गाळपाची क्षमता आहे हा कारखाना आमदार समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली आवताडे उदयोग समूहाने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आपल्या ताब्यात घेतला आहे.

या कारखान्यात उपपदार्थ निर्मितीची सोय असून ६५ के एल पी डी डीसलरीज निर्मिती होते. तर ३२ मेगावॅट को-जन निर्मितीही होते हा कारखाना सुरू झाल्याने सुमारे सातशे कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला आहे.

त्याचबरोबर २५० मोठ्या वाहनांचे करार झाले असून २०० डंपिंग ट्रॅक्टर व २०० बैलगाड्यांचेही करार केले असून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.

त्याच बरोबर आमदार समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचा सुमारे सहाशे एकर परिसर असल्याने कारखाना परिसरात तरुणांना आणखी रोजगाराच्या संधी निर्माण करणार असल्याचेही चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे म्हणाले की, हा कारखाना आम्ही साडेचार ते पाच हजार मे टन प्रतिदिन क्षमतेने चालविणार आहे. त्याच बरोबर हा कारखाना सुरू झाल्याबरोबर दीड महिन्यानंतर को-जन वीजनिर्मिती सुरू होणार आहे.

त्याचबरोबर डिस्टलरीही सुरू होणार असून ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे यांनी सांगितले.

यावेळी प्रा.येताळा भगत, भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, सोमनाथ आवताडे, जमदाडे सर यांनी मनोगते व्यक्त केली.

या कार्यक्रमास कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कूर्मदास चटके, विनायक यादव, भारत निकम, बापू काकेकर, ऍड.धनंजय जाधव, बिभीषण बेदरे, डॉ.ताणगावडे, गणेश गावकरे, विकास पुजारी, बापूसाहेब मेटकरी, तानाजी पाटील,

रावसाहेब राजमाने, शिवाजी रणे, सचिन चौगुले, चनबसू येनपे, नंदू जाधव, सुहास पवार, सुभाष सरगर, बालाजी मेटकरी, प्रसाद सातपुते, समाधान घायाळ, अमोल माने, जकापा नरुटे, जगन्नाथ रेवे, धनंजय पवार, चंद्रकांत पडवळे, तानाजी डोके, विलास राठोड,

भास्कर घायाळ, लक्ष्मण जाधव, आयुब शेख, दत्ता कोळेकर, गणेश पाटील, परमेश्वर येणपे, मोहन पवार, संभाजी फाळके, रघुनाथ उन्हाळे,

रमेश पवार, संपत आठकळे, वसंत लेढ्वे, बबन रोंगे, दामोदर रेवे, मिन्हाज शेख, अजय सरवळे, श्रीकांत रोंगे, रणजीत पवार  आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासो कदम यांनी तर आभार राजेंद्र पोतदार यांनी मानले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आवताडे शुगर्समंगळवेढा

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत! मंगळवेढा भूमी अभिलेख कार्यालयासमोर ‘या’ तारखेला भव्य ठिय्या; एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन

September 12, 2026
Next Post
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजी कारखान्यावर साखर शिल्लक नव्हती मग वाटप कसे सुरू? संचालकाचा सवाल

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा