टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील अवताडे शुगरच्या बगॅसला रात्री अचानक आग लागून सुमारे २ हजार टन बगॅस जळून खाक झाला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. या आगीमध्ये सुमारे ६० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे.
दि. १९ डिसेंबरच्या रात्री रोजी कारखान्याच्या बगॅसला अचानक भीषण आग लागली. त्यामुळे अंदाजे २००० टन बगॅस जळाला आहे.
आग लागल्याची माहिती कारखाना कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाच्या मंगळवेढा व पंढरपूर येथील अधिकाऱ्यांना संपर्क साधून अग्निशामक यंत्रणा बोलवून घेतली व लागलेल्या आजीवर नियंत्रण मिळवले.
आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अवताडे शुगरचा दुसरा गाळप हंगाम सुरू असून अचानक लागलेल्या या आगीमुळे मोठे नुकसान झाले असल्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे यांनी सांगितले
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज