टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली.
लिंगराज नागेश गणप्पा (वय २५, रा. चाकोते नगर, विडी घरकुल) असे आरोपीचे नाव आहे.२६ जून २०२१ रोजी आरोपीच्या दुकानात अत्याचाराची घटना घडली होती.
पीडित मुलगी बडीशेप घेण्यासाठी दुकानात आली होती. ती १५ ते २० मिनिटे झाली तरी घरी न परतल्याने आजीने दुकानाकडे येऊन मुलीला आवाज दिला. त्यावेळी आरोपी लिंगराज मुलीला बाहेर घेऊन आला.
मुलगी घाबरलेली दिसत असल्याने आजीने विचारणा केली. मुलीने अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली.
तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. ए. मोरे यांनी केला.११ ऑगस्ट २०२१ रोजी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल केले.विषेश न्यायाधीश श्रीमती यु.एल.जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली.
सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. अॅड. प्रकाश जन्नू यांनी बाजू मांडली. पीडिता ही घटनेच्या वेळी अल्पवयीन होती.
आरोपीला हे माहीत असूनही त्याने मुलीवर अत्याचार केल्याचे वकिलांनी साक्ष व पुराव्याच्या आधारे निदर्शनास आणून दिले.
हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ (२) अन्वये आरोपीस दोषी धरण्यात आले. त्याला २० वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड,
दंड न भरल्यास सहा महिन्याची शिक्षा सुनावली. पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या योजनेतून दोन लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
घटनेच्या ११ महिन्याच्या आत पीडितेस व तिच्या कुटुंबास न्याय मिळाला. आरोपीच्या वतीने अॅड. हेमंतकुमार साका यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज