टीम मंगळवेढा टाईम्स।
पंढरपुरात माघी वारी यात्रेसाठी आलेल्या तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे.
या भाविकांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अचानक भाविकांची प्रकृती बिघडू लागल्याने खळबळ उडाली.
सध्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डाॅक्टरांचं म्हणणं आहे. पंढरपुरात माघी वारी यात्रेनिमित्त लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथं येत असतात.
पंढरपुरातील आश्रमात अनेक भाविक प्रसाद घेण्यासाठी, तसंच जेवणासाठी येत असतात. येथील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये काल रात्री भाविकांनी भगर, आमटी खाल्ल्यामुळं त्यांना विषबाधा झाली.
यामध्ये 137 भाविकांना त्याची झळ बसली. रात्री दोन वाजता सर्व भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू जाणवून लागला, त्यामुळं त्यांना
उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज