टीम मंगळवेढा टाइम्स ।
महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या घरी सनई चौघड्यांचे सूर ऐकायला मिळत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील हिचा विवाह सोहळा होत आहे.
अंकिता हर्षवर्धन पाटील आता ठाकरे घराण्याची सून होणार आहे. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. राज ठाकरेंना लग्न पत्रिका प्रसारमाध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, अंकिता पाटीलचा विवाहसोहळा येत्या 28 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
मुंबईत हा विवाह सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी अंकिता आणि हर्षवर्धन पाटील हे लग्नाचं आमंत्रण देण्यात व्यस्त आहेत.
मंगळवारी हर्षवर्धन पाटील हे आपली मुलगी अंकितासह राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लग्नाची पत्रिका देत लग्नसोहळ्याचं खास निमंत्रण देण्यात आलं.
स्वत: अंकिता यांनी राज ठाकरेंसोबत भेटीचा फोटोही शेअर केला आहे. अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार ठाकरे याच्यासोबत अंकिता पाटीलचा विवाहसोहळा होत आहे.
आज मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली.@RajThackeray pic.twitter.com/sX6GGIWQCQ
— Ankita Harshvardhan Patil (@iankitahpatil) December 7, 2021
गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. येत्या 28 डिसेंबर रोजी निहार आणि अंकिता विवाहबंधनात अडकणार आहेत.
अंकिता पाटीलचा अल्प परिचय अंकिता पाटील या हर्षवर्धन पाटील यांची मुलगी आहे. त्यांनी परदेशात आपलं उच्चशिक्षण पूर्ण केलं आहे.
अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. हार्वड विद्यापीठात अंकिता आणि निहार यांची ओळख झाली होती.
निहार ठाकरेंचा अल्प परिचय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत निहार ठाकरे. निहार हे पेशाने वकील आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निहार यांचे काका आहेत.(स्रोत:News 18 लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज