मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
नवरा-बायकोत कौटुंबिक कारणावरून पतीने पत्नीला झोडपल्याच्या घटना कायम होत असतात. क्वचितप्रसंगी बायकोने नवऱ्याला मारहाण केल्याचेही ऐकिवात येते मात्र,
पुण्यात एक वेगळ्याच प्रकारच्या कारणावरून बायकोने नवऱ्याला हिंसक हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. घरात मोड आलेले हरभरे नवऱ्याने खाल्ल्याच्या कारणावरून बायकोने नवऱ्यावर तुफानी हल्ला केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी ही घटना घडली. त्यात बायकोने नवऱ्याच्या शरीरावर ठिकठिकाणी हाताच्या नखांनी एखाद्या मांजरीसारखे ओरबाडले.
तसेच त्याच्या डोक्यात मिक्सरचे भांडे दाणकन घातले. त्याच्या हाताची करंगळी जोरात चावून नख तोडून त्याला जखमी केले. या हल्ल्यानंतर प्रचंड घाबरलेल्या नवऱ्याने बायकोविरोधात थेट पोलिस ठाण्यातच तक्रार दाखल केली आहे.
सोनाली अमोल सोनवणे (४०) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती अमोल गुलाबराव सोनवणेने (४४, रा. सोमवार पेठ, पुणे) समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार अमोल सोनवणे यांनी घरातील स्वयंपाकघरात मोड आलेले काही हरभरे खाल्ले. ते पाहताच सोनाली प्रचंड संतापली. हरभरे का खाल्ले असा जाब ती विचारू लागली. गांगरलेल्या अमोल यांना त्याचे उत्तर देता आले नाही.
मग तिने अमोलला शिवीगाळ केली. तेवढ्यावर तिचे समाधान झाले नाही. तिने लाटण्याने नवऱ्याच्या डाव्या हाताच्या तळव्यावर मारले तसेच डोक्यात, पाठीवर मारले. मग नखांनी चेहऱ्यावर, गालावर, डाव्या कानाच्या पाठीमागे, पोटाला उजव्या बाजूस ओरखडून जखम केली.
या धुमश्चक्रीत बायकोच्या हातातील लाटणे हिसकावून घेण्यात अमोलला यश आले असता तिने मिक्सरचे भांडेच त्याच्या डोक्यात घातले. अमोल मटकन खाली बसल्यावर त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला जोरात चावा घेऊन नखच उपटून काढले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज