टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्य सरकारने काल सोमवारी एक आदेश काढून २०२३ खरीप हंगामात कापूस, सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत दिली जाईल. म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १० हजार रुपयांची मदत मिळेल. एकूण ४ हजार १९४ कोटी ६८ लाख रुपयांची मदत दिली जाईल.
त्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १ हजार ५४८ कोटी ३४ लाख रुपयांची, तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हजार ६४६ कोटी ३४ लाख रुपयांची मदत दिली जाईल.
०.२ हेक्टर वा त्यापेक्षा कमी शेतजमिनीवरील कापूस, सोयाबीनचे बाजारमूल्य पडल्यामुळे नुकसान झालेले असेल तर सरसकट एक हजार रुपये मदत दिली जाणार आहे.
नोंदणीकृत शेतकरीच पात्र
राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी अॅप/पोर्टलद्वारे लागवडीची नोंद केलेली होती असे नोंदणीकृत शेतकरीच या अर्थसाहाय्यासाठी पात्र ठरतील.
ई-पीक पाहणी अॅप/पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात (२०२३) आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अन्य कारणांमुळे कापूस, सोयाबीनचे दर घसरले होते व त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. कमी भावात त्यांना कापूस व सोयाबीन विकावे लागले होते.
शेतकरी नाराज..
लोकसभा निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला होता. कापूस, सोयाबीनला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी सरकारवर कमालीचे नाराज होते आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला पराभवाचे तेही एक प्रमुख कारण होते, असे म्हटले गेले होते. महाविकास आघाडीने या मुद्यावर सरकारला घेरले होते. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारा निर्णय घेतला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज