टीम मंगळवेढा टाईम्स ।
तिहेरी खून सत्रामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेल्या खून प्रकरणात समाधान महादेव लोहार (वय 33 रा.नंदेश्वर ता.मंगळवेढा) यास ताब्यात घेतले.
चौकशीत प्रथम गुन्हा केला नसल्याचे सांगीतले. परंतु तेथील परस्थितीजन्य पुराव्याच्या व गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्याकडे पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी दिली.
काल मंगळवारी दि. 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास मोजे नंदेश्वर लवटे वस्ती ता.मंगळवेढा येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून
दिपाली बाळु माळी (वय 25), पारुबाई बाबाजी माळी (वय 55), संगीता महादेव माळी (वय 47) या तीन महिलांचा अज्ञात हत्याराने व दगडाने मारुन खुन केल्याची माहिती पोलीस पाटील संजय गरंडे देताच
पोलीस निरीक्षक रणजित माने, सपोनि सत्यजित आवटे, सपोनि अंकुश वाघमोडे, पोसई सौरभ शेटे, परि. पोसई पुरूषोत्तम धापटे, सपोफी अविनाश पाटील,
पोहेकॉ सुनिल गायकवाड, पोना विठ्ठल विभुते, पोना विक्रम काळे, पोना बापू पवार, पोकों कैलास खटकाळे पोकों राजु आवटे हे तात्काळ घटनास्थळी हजर होवून परस्थितीची पाहणी केली.
आजुबाजुच्या लोकाकडे सदर खुन कोणत्या कारणासाठी, कशामुळे. कोणासोबत पुर्वीची भांडणे होती. काय अशा सर्व बाबीच्या अनुशंगाने तपास केला व गोपनीय बातमीदाराच्या मार्फतीने चौकशी करुन
संशयीत समाधान महादेव लोहार यास ताब्यात घेतले. चौकशीत प्रथम गुन्हा केला नसल्याचे सांगीतले. परंतु तेथील परस्थितीजन्य पुराव्याच्या व गोपनीय माहितीच्या आधारे त्याच्याकडे पोलीसांनी कसून चौकशी केली असता त्यांने गुन्हा केल्याचे कबुली दिली.
तपासात शेतीच्या बांधाच्या कारणावरुन व पूर्ववैमनस्यातून हातातील बेडग्याने (कुदळीने) तीन महिलाच्या डोक्यात मारुन व डोकीत दगड घालून जिवे ठार मारल्याचे सांगीतले आहे.आरोपीवर भादवि कलम 302 असुन आरोपीस अटक केली.
सदर खुन करण्यामागे इतर कोणते काही कारण आहे का याचा तपास पो.नि.रणजित माने करीत आहे. घटनास्थळी उपविभागीय अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी भेट दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज