mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

School Admission : इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचे वय बदलले, नवं शैक्षणिक धोरण लागू; केंद्र सरकारचे सर्व राज्यांना आदेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 23, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

केंद्र सरकारने शाळेत प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांचं वय निश्चित केलं आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार शिक्षण पद्धतीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळाच्या प्रवेशासाठी नवीन नियम लागू केला आहे.

यानुसार, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण असणं गरजेचं आहे. सहा वर्ष पूर्ण नसल्यास विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही.

केंद्र सरकारकडून शैक्षणिक नियमांत हा मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्षे हे शिकण्यासाठीचा मुलभूत टप्पा आहे.

जुने नियम काय होते?

देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठीचे वय वेगवेगळे होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये लोकसभेत एका प्रश्नावर दिलेल्या माहितीनुसार, यामधील 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुलांच्या पहिली इयत्तेतील प्रवेशासाठी सहा वर्षे वय असण्याचा नियम लागू नव्हता.

येथे मुलांना वयाची 6 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पहिली इयत्तेत प्रवेश घेण्याची परवानगी होती. गुजरात, तेलंगणा, लडाख, आसाम आणि पुद्दुचेरी ही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे 5 वर्षांच्या मुलांनाही पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र आता सरकारने नवीन नियम लागू केला आहे.

‘या’ राज्यांमध्ये मुलांचे वय पाच वर्षांहून जास्त असणे आवश्यक

लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक, गोवा, झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये पहिली इयत्तेमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांचे किमान वय पाच वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली होती.

28 मार्च 2022 रोजी, शिक्षण मंत्रालयाने लोकसभेत हा अहवाल सादर केला होता. त्यानुसार, विविध राज्यांतील प्रवेश प्रक्रिया ही राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नसल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमधील प्रवेशाचे नियम वेगवेगळे असल्याचं समोर आलं होतं.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनेक बदल

केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षण प्रक्रियेमध्ये विविध बदल, नवीन कामं आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. आता मुलांसाठी नवीन अभ्यास साहित्य प्रसिद्ध करण्यात आलं असून याला ‘जादूई पिटारा’ म्हणजे जादूची पेटी असं नाव देण्यात आलं आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या ‘जादूई पिटारा’ लाँच करण्यात आला. मात्र, सध्या ‘जादूई पिटारा’ हा एलिमेंट्री लेवलच्या विद्यार्थ्यासाठी आहे.

हा जादूची पेटी प्राथमिक स्तरावरील मुलांमध्ये अभ्यासाची आवड आणि कल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. या बॉक्समध्ये मुलांसाठी खेळणी, बाहुल्या, मातृभाषेतील रंजक कथा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय खेळ, चित्रकला, नृत्य, संगीत यावर आधारित शिक्षणाचाही जादूच्या पेटीत समावेश करण्यात येणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

ADVERTISEMENT

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: वयोमर्यादा पहिली प्रवेश
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

सभापती सोमनाथ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढ्यातील शाळांचा कायापालट होणार, शाळांचे भौतिक रुपडे बदलणार, निधी मंजूर; सोमनाथ आवताडे यांची माहिती

March 29, 2023
मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर, MPSC च्या परीक्षाबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

उमेदवारांनो! एमपीएससीच्या सूचना पाळा, नाहीतर व्हावे लागेल डिबार; उमेदवारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

March 28, 2023
मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

मोठी बातमी! राहुल गांधी यांची खासदारकी रद्द; नेमकं काय कारण? कायदा काय सांगतो

March 24, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

खाजगी शाळातील भरमसाठ फी प्रकरणाचा प्रश्न आ.आवताडेंनी अधिवेशनात चव्हाट्यावर आणला; मदतीला विरोधी पक्षनेतेही धावले

March 23, 2023
मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

मोठा झटका! राहुल गांधींना कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

March 23, 2023
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

पालकांनो! शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी अर्ज सादर करण्यात मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज सादर करता येणार

March 25, 2023
कष्टाचे चीज केले! जमीन विकून मुलाला केले जिल्हाधिकारी; श्रीकांत खांडेकर यांनी वडिलांना खुर्चीवर बसवून केला सन्मान

कष्टाचे चीज केले! जमीन विकून मुलाला केले जिल्हाधिकारी; श्रीकांत खांडेकर यांनी वडिलांना खुर्चीवर बसवून केला सन्मान

March 18, 2023
संधी! 10वी,12वी उत्तीर्ण धारकांना मोठ्या कंपनीत नोकरीची संधी, मंगळवेढ्यात विविध पदासाठी होणार मोठी भरती; येथे करा अर्ज

मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त जागांची भरती सुरू; अर्ज करण्याचे आमदार आवताडे यांचे आवाहन

March 14, 2023
विद्यार्थ्यांनो! टीईटी आणि नेट परीक्षा एकाच दिवशी, एसटी संपामुळे उमेदवारांची गैरसोय; टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

पालकांनो! दहावीच्या सुरु असलेल्या पेपरचे काय होणार? विद्यार्थी व पालक कोड्यात

March 14, 2023
Next Post
मंगळवेढा तालुक्यातून एकही बैलगाड्यांचा सहभाग नाही

सोलापूर जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरविण्यास परवानगी; 'या' आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे लागणार

ताज्या बातम्या

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

स्व.महादेवराव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवा कीर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन

March 29, 2023
खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

खासदार गिरीष बापट यांचं पुण्यात निधन; भाजपचा किंगमेकर हरपला

March 29, 2023
Breaking! मंगळवेढा शहरातून १४ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण; अपहरणकर्त्याविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले; अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल

March 29, 2023
Breaking! मंगळवेढ्यात जावयाने काढला सासूचा काटा; धारदार शास्त्राने सपासप वार करून केला खून

संतापजनक! विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल

March 29, 2023
सभापती सोमनाथ आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढ्यातील शाळांचा कायापालट होणार, शाळांचे भौतिक रुपडे बदलणार, निधी मंजूर; सोमनाथ आवताडे यांची माहिती

March 29, 2023
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

चुकीला माफी नाही! चेक बाऊन्स प्रकरणी मंगळवेढ्यातील ठेकेदारास 8 महिने तुरूंगवासाची शिक्षा

March 29, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा