टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बैलगाडी शर्यत भरविण्यास आयोजकांना परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी काढले.
लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरविणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार उपविभागीय अधिकारी यांना त्यांच्या उपविभागाच्या
कार्यक्षेत्रामध्ये बैलगाडयांच्या शर्यतीस यापूर्वीच अधिकार प्रदान केले असले तरी, शासन अधिसूचना मधील अटी व शर्थीच्या अधीन राहून बैलगाडी शर्यत आयोजनास परवानगी देण्यात आली आहे.
शासन अधिसूचना, शासन निर्णय, शासन परिपत्रकामधील अटी व शर्थीचे पालन आयोजकांनी काटेकोरपणे करणे बंधनकारक राहील,
शर्यतीतील सर्व बैलांच्या जोडयांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लसीकरण केल्याचे शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील, ज्या गावांमध्ये बैलगाडी शर्यत घेण्यात येणार आहे.
त्या गावातील सर्व गोवंशीय जनावरांचे लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण १०० टक्के पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे
बैलगाडी शर्यत भरविण्याबाबत काढण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिता विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५६ तसेच प्राण्यांमधील संक्रामक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदींमुळे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज