मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने शासनाने लॉक डाउन लागू केला आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या व बेघर असलेल्या आपल्या समाज बांधवांची उपासमार होत आहे. अश्या बेघर लोकांना व गरजु व्यक्तींना मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जिवनावश्यक वस्तु पोहोच करणेचा संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे.
जेणेकरून अन्नासाठी त्यांची भटकंती होणार नाही व ते घरीच थांबतील. कारण ते सुरक्षित राहिले तर संपूर्ण समाज सुरक्षित रहातील यामध्ये किमान आवश्यक वस्तू 4 व्यक्तींच्या कुटुंबासाठी किमान 20 दिवस पुरतील असे तांदुळ, आटा, तूरडाळ ,खाद्यतेल, साबण किमान 2 – आंघोळीचा व कपड्यांचा, तिखट/हळद/मीठ इ. वाटप करणार असल्याचे यावेळी सभापती सोमनाथ आवताडे यांनी सागिंतले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज