पंढरपूर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने सावकारांकडून घेतलेल्या कर्जानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन केले आहे. शेतकऱ्याने टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. त्या शेतकऱ्याला खाली उतरवताना प्रशासनाला नाकीनऊ आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू जोपर्यंत दखल घेत नाहीत तोपर्यंत टॉवरवरुन खाली येणार नाही, अशी भूमिका तरुण शेतकऱ्यानं घेतली आहे
इब्राहिम मुलानी याने या बदल्यात 14 महिन्यानंतर 1 लाख 43 हजार परत दिले. मात्र, सावकार भोसले पिता-पुत्राने इब्राहिमकडून घेतलेले 12 लाखाचे कोरे चेक बँकेत भरले. याप्रकरणी भोसले पिता-पुत्राचा निषेध म्हणून आणि न्याय मिळावा यासाठी इब्राहिम मुलाणी हा तरुण आज जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या टॉवर इब्राहिम मुलाणी चढला. जोपर्यंत सावकारांकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळत नाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री बच्चु कडू यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. त्यानंतरच टॉवर वरून खाली येणार असल्याचा पवित्रा इब्राहिम मुलानी यांनी घेतला आहे.
महसूल कर्मचाऱ्यास मारहाण
खासगी सावकारकीला कंटाळलेल्या पंढरपूर तालुक्यातील उंबरेपागे येथीलशेतकरी इब्राहिम याकूब मुलाणी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील टॉवरवर चढून आंदोलन करीत होते. मात्र, महसूल कर्मचारी त्या शेतकर्यास खाली उतरण्यासाठी टॉवरवर गेले असता प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांशी बाचाबाची झाली. शिवीगाळ करीत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्या महसूल कर्मचार्यास मारहाण केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज