mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात मोकाट फिरणार्‍यावर आता होणार कडक कारवाई; ड्रोन कॅमेराद्वारे ठेवली जाणार नजर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 3, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकातील मेडिकल दुकाना समोरील गर्दी वाढत्या कोरोनाला आमंत्रण देत असल्याने सोलापूरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांनी भेटीप्रसंगी प्रत्यक्ष पाहिल्याने सर्व मेडिकलवाल्यांना एकत्र बोलावून कोरोना नियमांचे पालन करा अन्यथा वेळ पडल्यास मेडिकल सील करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मंगळवेढयातील वाढता कोरोनाचा आकडा व मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरा द्वारे रस्त्यावर मोकाट फिरणार्‍यावर कॅमेरातून नजर ठेवून कारवाई केली जाणार आहे.

सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी मंगळवेढयास धावती भेट दिली. या दरम्यान शहरात प्रथम आल्यानंतर चोखामेळा चौकात मेडिकलच्या समोर मोठया प्रमाणात गर्दीचे चित्र दिसल्याने सर्व मेडिकलवाल्यांना एकत्र बोलावून कोरोनाचे नियम पाळा, टेस्टिंग करा, ग्राहकांमध्ये अंतर ठेवा अशा सक्त सुचना करून नियम न पाळल्यास मेडिकल नाईलाजाने सील करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ग्रामीण भागात शेती उद्योगामुळे मजूर, शेतकरी बाहेर पडतात. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शहरात रूग्णांची संख्या कमी असून ग्रामीण क्षेत्रामध्ये जास्त असल्याचे ते म्हणाले. मंगळवेढा शहरात मोकाट फिरणार्‍यांची संख्या जादा असल्याने कारवाईसाठी जादा फोर्स देण्यात आला असून अजून नव्याने पाच चारचाकी वाहने देण्याचे नियोजन आहे.

मेडिकलवाल्यांची जाग्यावर रॅपीड टेस्ट करण्याच्या सुचना नगरपालिकेस केल्या. अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी डीवायएसपी कार्यालयात सांगोला व मंगळवेढा पोलिस अधिकार्‍यांची कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर बैठक घेवून मार्गदर्शनपर सुचना केल्या.

मंगळवेढा तालुक्यात वाढता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करूनही काही मोकाट लोक विनाकामाचे रस्त्यावर फिरत असल्यामुळे कोरोनाची साखळी कशी तुटणार? याबाबत पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलत कारवाईसाठी मंगळवेढयात ड्रोन कॅमेराचा वापर करण्याचा इशारा दिला आहे.

या ड्रोन कॅमेरामधून कोणाचीही सुटका होणार नाही. रस्त्यावर मोकाट फिरणार्‍याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीसमोर भाजीपाला विक्रेते गर्दी करीत असल्याने तसेच हॉटेल व ढाबे पार्सल देण्याऐवजी उद्यडे ठेवत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलिस प्रशासनाने दिला.

यावेळी डीवायएसपी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, सांगोल्याचे पोलिस निरीक्षक निंबाळकर आदि उपस्थित होेते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना उद्रेकमंगळवेढा पोलीस स्टेशन

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
Next Post

उजनीचा पाणीप्रश्न पेटला! हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष समितीचे उजनी धरणात जलसमाधी आंदोलन

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..