mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संतापजनक! घरातील पितृदोष घालवतो, आर्थिक संकट दूर करतो म्हणत, भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार; मंगळवेढा पोलिसात गुन्हा; तिघांना अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 17, 2023
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
भोंदूबाबा! मंगळवेढ्यात गुप्तधन काढून देण्याचा बहाणा करणाऱ्या महाराजाच्या मुसक्या आवळल्या; मिळाली ‘इतक्या’ दिवसाची पोलिस कोठडी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

घरातील आर्थिक संकट दूर करतो, होम हवन करून घरात सुख शांती आणतो असे सांगून मंगळवेढा येथील वीस वर्षीय महिलेला पुणे जिल्ह्यातील ठाणगाव येथे नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी

आप्पा कोळेकर महाराज त्याचा सेवक दत्ता सोनबा पासलकर दोघे रा.ठाणगाव, पानशेत जिल्हा पुणे व समाधान अर्जुन गडदे (रा. तरटगाव, ता.पंढरपूर) यांचे विरुद्ध मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादीच्या पतीला व्यवसायामध्ये तोटा झाल्यानंतर कुटूंब आर्थिक संकटात सापडले. त्यावेळी पतीचे मित्र समाधान अर्जुन गडदे (रा. तरटगाव, ता. पंढरपूर) यांनी

पतीला माझ्या ओळखीचे आप्पा कोळेकर महाराज हे लिंबू नारळ वगैरे साहित्यासह विधी होम हवन करून संकटे दूर करतात त्यांच्या तीन वेळा वाऱ्या कराव्या लागतात. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत चला असे सांगून समाधान गडदे यांनी दोन वेळा फिर्यादीच्या पतीला ता तिसऱ्या वेळेस फिर्यादीला सोबत नेऊन विधी करावे लागतील असे सांगण्यात आले.

दि.२६ मार्च २०२३ रोजी आरोपी हे फिर्यादीच्या घरी आले व त्यांनी हॉलमध्ये होम हवन करता आणलेले नारळ, विधीचे साहित्य कापूर, उद, लिंबू व काळ्या कपड्याच्या दोन बाहुल्या असे सर्व साहित्य आणून होम केला

व तो भस्म झाल्यानंतर तो भस्म घरात जपून ठेवायला सांगितला व फिर्यादीच्या कुटुंबाला पितृदोष लागलेला आहे, तो घालवण्यासाठी ठाणगाव येथे यावे लागेल व तीन दिवस विधी करावा लागेल असे सांगून गेले.

त्यानुसार समाधान गडदे यांनी स्वतःकडे असलेल्या बोलेरो गाडीमधून दि.८ एप्रिल रोजी आप्पा कोळेकर महाराजांचे दर्शन झाल्यानंतर त्यांची डोंगराच्या पायथ्याशी राहण्याची सोय केली व सायंकाळी भगवे कपडे घालून साडेसात वाजता मंदिराकडे येण्यास सांगितले.

महाराजांच्या सांगण्यानुसार भगवे कपडे घालून फिर्यादी व कुटुंब महाराजांच्या मंदिरात गेले असता महाराजांनी फिर्यादीला एकटीला माझे सोबत डोंगरावरील मंदिरात जायचे आहे, असे सांगून एकटीला सोबत घेऊन मोबाईलच्या उजेडात ते मंदिरात गेले.

त्या ठिकाणी नारळ ठेवण्यास सांगितला व मोबाईलचा टॉर्च बंद केला आणि अंधारात फिर्यादीला जवळ घेत धाडस वाढव, देव तुझा जवळ येत आहे, तू माझ्या पूर्वजन्मीची पत्नी आहे असे म्हणून जवळील भस्म पावडर अंगावर टाकून सर्वांगावर हात फिरवू लागला.

त्यावेळी फिर्यादीने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादीच्या तोंडावर हात ठेवून तुझ्या अंगामध्ये देवी प्रकट होत आहे, येथे कोणी जवळ नाही तुला इथून कुठेही जाता येणार नाही तू आरडा ओरडा केली तर जीव मारीन अशी धमकी देऊन जबरदस्तीने शरीरसंबंध केले.

त्यानंतर फिर्यादीने ठाणगाव मंदिरात झालेल्या लैंगिक अत्याचाराचा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर मंगळवेढा पोलीस ठाण्यात संबंधित भोंदू महाराज व त्यांच्या साथीदाराविरुद्ध लैंगिक अत्याचार व जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजित माने करीत आहेत.

माझ्या देवाची रेंज दोन हजार किलोमीटर

धाडस वाढव, देव तुझ्या जवळ येत आहे तू पूर्वजन्मीची माझी पत्नी आहे असे म्हणत पीडितेवर अत्याचार करून तू कुणाला सांगितले तर माझ्या देवाची रेंज २ हजार कि.मी. आहे. मी मंत्र मारून तुला व तुझ्या कुटुंबास उद्ध्वस्त करून टाकीन अशी धमकीही भोंदू महाराजाचे दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

उत्तरपूजेला घरी येऊन केला विनयभंग

१४ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता आप्पा कोळेकर महाराज, सेवक दत्ता, महाराजांचा मुलगा व समाधान गडदे पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ मधून घरी आले.

व घरातील सर्व लोकांना बोलावून घेऊन तुमच्या घरात उत्तरपूजा करावयाची आहे, असे म्हणत घरात धूप पेटवले व फिर्यादीला किचन खोलीत नेऊन अंगावर भस्म टाकून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले.

तसेच फिर्यादीला परत ठाणगाव येथील डोंगरावरील मंदिरात यावे लागेल, असे म्हणून किचन मधून बाहेर आले व घरातील सर्व लोकांवर भस्म देऊन तुम्हाला आर्थिक लाभ होईल,

घरात सुख शांती लाभेल, तुमच्या व्यवसायात भरभराटी होईल असे सांगितले व समाधान गडदे यांनी महाराजांची दक्षिण म्हणून वीस हजार रुपये घेऊन ते निघून गेले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भोंदूबाबा

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
Next Post
उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला ‘हा’ इशारा पाहून वेळीच सावध व्हा..!

नागरिकांनो! उष्माघात टाळण्यासाठी 'ही' काळजी घ्या; सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बागडे यांचे आवाहन

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा