मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यांमध्ये रोजगाराच्या व्यवसायाच्या व उद्योगाच्या संधी कमी असल्यामुळे शिक्षणानंतर या भागातील तरुणांना नोकरीसाठी पुणे मुंबई सांगली कोल्हापूर चाकण या भागात जावणे लागत होते
तर कमी शिक्षण झालेल्यांना कर्नाटक व सांगली कोल्हापूरला ऊस तोडणी साठी तर मिळेल त्या व्यवसायातून रोजगारनिमिर्ती जावे लागत होते येथील तरुणांना उच्च शिक्षित होऊनही नोकरीच्या संधी कमी होत्या
उद्योग रोजगार व सेवा क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असतानासुद्धा त्यातून रोजगाराच्या संधी तालुक्यातील तरुणांना देऊ शकतो ही बाब आ. समाधान आवताडे व औद्योगिक दृष्टी असणारे संजय आवताडे यांनी नेमकेपणाने हेरली.
स्वतच्या शिक्षणात दोघा भावंडाना संघर्ष करावा लागला आणि व्यवसायातही संघर्ष करावा लागला पण शांत डोक्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवत यांनी मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून
दयाची अशी इच्छा बाळगली म्हणून त्यांनी आपला पारंपारिक ठेकेदारीच्या व्यवसायाला नवीन रूप द्यायचे ठरवले आणि अल्पावधीतच या उदयोगाने राज्याच्या सीमा पार करून देश पातळीवर आपला दबदबा निर्माण केला
परिश्रम जिद्द चिकाटी, सातत्य, या जोरावर एस.एम. आवताडे कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने यशोशिखर गाठले पंढरपूरात वारक्यांच्या सोयीचे काम या कंपनीने ठरवून दिलेल्या दिवसापेक्षा कमी दिवसात केल्यामुळे जिल्ह्याधिकायांनी गौरव केला होता
भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या मुळातच चाणाक्ष बुद्धी व उत्तम प्रशासक असणाऱ्या संजय अवताडेयांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला व अल्पावधीत तरुण उद्योजकांचे ते रोल मॉडेल झाले
आज त्यांचा आदर्श घेऊन अनेक तरुण उद्योग व्यवसायात उतरले सामान्य कुटुंबातील तरुणांना वाहन व्यवसायामध्ये संधी देऊन कोणाला जेसीबी कुणाला ट्रॅक्टर कुणाला टू टेन मशीन घेऊन दिल्या
त्याच बरोबर या सर्व मशीन आपल्या व्यवसायामध्ये समाविष्ट करून घेतल्या व त्यांना उद्योजक बनवले अशाप्रकारे दूरदृष्टी ठेवून योग्य नियोजन करून नवीन पिढीशी संपर्कात राहून त्यांना उद्योगामधील मार्गदर्शन करत असतात
आज हे आज अनेक शेतकरी कुटुंबातील शेती व्यवसाय करणारी दूध व्यवसाय करणारी तरुण बाजारपेठेमध्ये व्यवसाय करणारे व्यवसायिक त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असतात आणि आपल्या या सर्व कार्य बाहुल्या तून वेळ काढून अशा तरुणांना ते मार्गदर्शन करत असतात
संवाद साधण्याचे उत्तम कौशल्य व कामकाजाची योग्य पद्धत व कामाची विलक्षण ऊर्जा असल्यामुळे आज ते व्यावसायिकांमध्ये आणि तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आहेत आजही अनेक तरुण आपल्या व्यवसायाचा शुभारंभ संजय अवताडे यांच्या शुभहस्ते करतात
आपला ठेकेदारी चा व्यवसाय सांभाळत असताना त्यांनी आपले बंधू आ.समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवताडे स्पिनर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करून सूतगिरणीचे अत्याधुनिक टेक्निक बाजू असणारी सूतगिरणी उभा केले
आज ही या सूत गिरणी मध्ये महिला गरजू तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या प्रॉडक्ट च्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता उच्च प्रतीचे सुत यार्न या सूत मिल मध्ये उत्पादित होते
त्यामुळे उत्पादीत मालाला अन्य बाजारपेठेत चांगली मागणी आहे व्यवसायाच्या बाहेर जावून कामगारांच्या सुख दुःखा मध्ये ते सहभागी होतात कोरोना च्या काळामध्ये त्यांनी स्वखर्चाने कामगारांचा विमा उतरवला लाखो रुपयांची बिले या कालावधीमध्ये होत होती.
परंतु या विमा कवच असल्यामुळे याचा लाभ सूत मिल मध्ये असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना झाला अशाप्रकारे एक सामाजिक भान ठेवून उद्योग व्यवसाय करणारे संजय अवताडे होय.
चिरा चिरा हा घडवावा !कळस कीर्तीचा चढवावा! अशा पद्धतीने उद्योग व्यवसायामध्ये यशाचे शिखर सर करत आहेत या उद्योग व्यवसायाचे भरभराट होत असून असे उद्योग पंढरपूर तालुक्यात सुद्धा निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे – दिगंबर यादव, मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज