mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कसून शोध! मंगळवेढ्यातील अपहरणग्रस्त बालकाच्या शोधासाठी पोलिसांची पथके पोहचली ‘या’ राज्यात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 8, 2022
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
आई-वडिलांचा आक्रोश! मंगळवेढ्यातून अपहरण झालेल्या बालकाचा २४ तासांनंतरही शोध लागेना; श्वान पथकाने सर्वत्र तपास सुरू; मुलाचे असे आहे वर्णन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील एम आय डी सी परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षीय बालकाच्या शोधासाठी मंगळवेढा पोलिसांच्या दोन पथकांनी छत्तीसगडमध्ये नातेवाईकांकडे कसून चौकशी केली.

तर कर्नाटकमध्येही विविध ठिकाणी जावून त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो आजघडीला तरी मिळून आला नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, दोन्ही राज्यामध्ये बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पोलिस स्टेशन येथे त्या बालकाचे पोस्टर्स लावून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

दि.18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.00 वा.एम आय डी सी परिसरातून रणवीरकुमार साहू (वय 4 वर्षे रा.छत्तीसगड) याचे अज्ञाताने फूस लावून अपहरण केले आहे.

या घटनेला जवळपास 20 दिवस उलटून गेले असून पोलिस यंत्रणा घटनेच्या पहिल्या दिवसापासून चोहोबाजूने तपास करण्यात मग्न आहे.

दरम्यान पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी राजश्री पाटील,पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी खुद्द छत्तीसगड राज्यात सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाो पिंगळे यांचे पथक पाठवून शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सदर ठिकाणी या पथकाने जिल्हयाचे पोलिस अधिक्षक यांना प्रत्यक्ष भेटून संपूर्ण जिल्हयातील पोलिस ठाण्यांना याची माहिती देण्यात आली.

डी.जी.कंट्रोल रायपूर येथे भेट देवून त्यांनी संपूर्ण राज्यामध्येही अपहरणकर्त्या मुलाविषयी कळविण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांनाही भेटून मुलाच्या अपहरणाबाबत माहिती देण्यात आली. अपहरणकर्त्या मुलाचे नातेवाईक यांचेकडे कसून चौकशी करून या कुटुंबाची कुणाशी दुष्मनी व संपत्तीविषयी वाद आहे का? आदीबाबत चौकशी करण्यात आली.

तसेच या पथकाने गावचे सरपंच, कोतवाल यांना भेटून या मुलाचे पोस्टर्स देवून सदर ठिकाणी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी अथवा तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले.

दुसरे पथक सहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यजीत आवटे यांचे कर्नाटक राज्यातील इंडी, चडचण, अथणी, विजापूर, अफजलपूर, गाणगापूर आदी ठिकाणी भेटी देवून मुलाचे फोटो दाखवून चौकशी करण्यात आली.

या पथकाने रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरात मुलाचे फोटो डकवून नागरिकांना पोस्टरमधील मुलगा नजरेस आल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले.

मुलाचे अपहरण केल्यापासून मंगळवेढा पोलिस रात्रीचा दिवस करून शोध घेत आहेत मात्र त्यास अदयापही यश मिळत नसल्यामुळे पोलिस यंत्रणा गंभीर होवू पहात आहे.

आत्तापर्यंत पोलिसांनी श्वान पथक, नातेवाईकांचे हातांचे ठसे, माण व भिमा नदीत शोध घेतला. विविध 9 पथकाव्दारे तसेच स्थानिक गुन्हे शाखा,जिल्हयातील 6 डि.वाय.एस.पी.कार्यालयातील तज्ञ पोलिस कर्मचारी आदींच्या माध्यमातूनही सातत्याने तपास सुरु आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा अपहरण

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश शेती दौऱ्यावर जाण्याची संधी; कृषी विभागाकडून अर्ज करण्याचे इच्छूक शेतकऱ्यांना आवाहन

August 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठे काय आहेत हे दाखवून देऊ! मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ

August 9, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
Next Post
मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ ग्रामपंचायती बिनविरोध; सरपंच, सदस्य, सर्वाधिक अर्ज, निवडून आलेली नावे बघा…

मंगळवेढा तालुक्यात पहिला गुलाल भाजपने उधळला; 'या' ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व सदस्य बिनविरोध

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश शेती दौऱ्यावर जाण्याची संधी; कृषी विभागाकडून अर्ज करण्याचे इच्छूक शेतकऱ्यांना आवाहन

August 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठे काय आहेत हे दाखवून देऊ! मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ

August 9, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..