टीम मंगळवेढा टाईम्स।
मागील भांडणाचा राग मनात धरून ४२ वर्षीय महिलेस मारहाण करून शिवीगाळ तसेच दमदाटी केल्याप्रकरणी भागवत कृष्णा बेंद्रे, मिना भागवत बेंद्रे, रोहित बाबुराव माईनकर, गौरी रोहित माईनकर (सर्व रा.शनिवार पेठ) या चौघांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, यातील फिर्यादी महिला नंदा अंबादास बेंद्रे (वय ४५, रा.शनिवार पेठ) हया सायंकाळी ४.०० वाजता वरील आरोपीचे राहते घरासमोरून जात असताना
वरील आरोपीनी मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीचा मुलगा सागर यास शिवीगाळ केली.
यावेळी फिर्यादीने तुम्ही विनाकारण शिव्या देवू नका असे समजावून सांगत असताना आरोपी यांनी फिर्यादीस व फिर्यादीची जाऊ सारिका
यांना शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक कृष्णा जाधव हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज