मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा बसस्थानकावर बस मध्ये चढत असताना दोन महिलांचे गळ्यातील ८० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान बसस्थानकावर कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्त नेमण्याची मागणी या घटनेनंतर अग्रक्रमाणे पुढे येत आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी विमल बाळू पवार (वय ६५ रा. येड्राव) यांचा मुलगा दत्तात्रय हा शिक्षक असून तो मंगळवेढ्यात कुटूंबासह रहावयास असल्याने दि. १३ रोजी सकाळी १० वाजता मुलास भेटण्यासाठी मंगळवेढ्याला आल्या होत्या.
सायंकाळी ४ वाजता मुलाने मोटर सायकलवरुन बसस्थानकावर सोडले. तद्नंतर मंगळवेढा-लवंगी या सायंकाळी ५ च्या बसने जाण्यासाठी गर्दीत बस मध्ये चढत असताना एक तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसुत्र अज्ञात चोरट्याने चोरले.
तसेच ही चोरीची घटना कंडक्टरला सांगत असताना फिर्यादी बरोबर बस मध्ये चढत असलेल्या शारदा मच्छिंद्र जाधव ( वय६५ रा. सलगर बु।। ) त्यांच्याही गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसुत्र अज्ञात चोरट्याने चोरुन नेले.
या घटनेनंतर आरडाओरडा झाल्याने सर्व प्रवाशी खाली उतरले. फिर्यादीने मुलगा दत्तात्रय यास स्टँडवर बोलवून घडला प्रकार सांगून डेपो मॅनेजर यांना भेटून पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे.
दरम्यान मंगळवेढा बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते यापुर्वीही अनेकवेळा बस मध्ये चढत असताना मंगळसूत्र चोरण्याच्या घटना घडल्या आहेत.
या घटनेला आळा घालण्यासाठी बसस्थानकावर पोलीसांची गरज असल्याने प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी येथे पोलीस नेमूण होणाऱ्या चोऱ्यांना अटकाव करावा अशी प्रवाशांतून मागणी होत आहे.
मध्यंतरी चोरीचा प्रकार काही प्रमाणात कमी झाला होता पुन्हा या घटनेत वाढ झाल्याचे दिसुन येत आहे. बसस्थानकामध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे आहेत. मात्र बस मध्ये चढताना दरवाजातील गर्दीत या संधीचा फायदा चोरटे घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज