मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर-मंगळवेढा रोडवर हिंगोली गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ एका कारने पाठीमागून मोटारसायकलला जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील तरुण जागीच ठार झाला,
तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.
तुषार अनिल पवार (वय-२२, रा. राजेश कोठेनगर, सोलापूर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघात इतका भीषण होता की, कारने मोटारसायकल (एमएच-१३ ईक्यू ०५६६) ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उड्डून पडली.
कार (एम.एच-०९ जी.एम-००६४) गाडीचा वेग इतका होता की, तिचा ब्रेक न लागल्याने ती सुमारे तीनशे मीटर अंतरावर जाऊन थांबली.
अपघात घडताच या रस्त्यावरून जाणारे भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तात्यासाहेब नागटिळक हे थांबले. त्यांनी तातडीने स्थानिक पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी माहिती दिली.
पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेतली. तुषार पवार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज