टीम मंगळवेढा टाईम्स।
शेती विकून पैसे देणार की नाही? असे म्हणून मुलाने ७५ वर्षीय वडिलास काठीने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले
तसेच तुम्हांला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी आरोपी तथा मुलगा बिराप्पा दगडू पडोळकर (रा.पडोळकरवाडी) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी, दि. १७ रोजी सायंकाळी ७ वाजता पडोळकरवाडी येथील राहते घरामध्ये यातील फिर्यादी तथा जखमी दगडू कृष्णा पडोळकर (वय ७५) हे चहा पिवून बसले होते.
दरम्यान यावेळी आरोपी तथा मुलगा बिराप्पा पडोळकर हा दारु पिवून घरी आला व त्याने शेती विकून मला पैसे देणार आहे की नाही असे म्हणून शिवीगाळी दमदाटी करु लागला.
त्यावेळी फिर्यादीने मी शेती विकणार नाही असे म्हणताच आरोपी फिर्यादीच्या अंगावर धावून गेला व लाकडी काठीने डावे हातावर मारुन गंभीर जखमी केले.
यावेळी फिर्यादीने आरडाओरड केल्यावर शेजारी राहणारे विष्णू मोटे तेथे आले व त्यांनी भांडणे सोडवासोडवी केली. आरोपीने फिर्यादीस तू शेती कसा विकत नाही,
तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देवून निघून गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज