टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील दामाजी कारखाना बायपास रोडवरील श्री कृष्ण कॉलनी मधील शिवराय गणेश उत्सव तरुण मंडळाने तालुक्यातील सर्वात मोठी 13 फूट उंचीच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली आहे.
कोल्हापूर येथील कारागीराने ही बाप्पाची मूर्ती बनवली असून रात्री 11 वाजता या बाप्पाचे आगमन मंगळवेढा शहरात झाले.
शिवराय गणेश उत्सव तरुण मंडळाचे अध्यक्ष विक्रम दत्तू, उपाध्यक्ष सौरभ पाटील, खजिनदार प्रकाश पवार, दत्तात्रय जाधव, अशोक फुगारे, पोपट रणे, विजय पडवले, दत्ता जाधव, सचिन कदम, विनोद दत्तू, सूरज फुगारे यांनी पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचे स्वागत केले.
मंगळवेढा शहर व तालुक्यात पावसाच्या आशेवर लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले तर चिमुकल्यांनी आमच्या पप्पांनी गणपती आणला’ अशा उत्साही गाण्याच्या तालावर दुष्काळी परिस्थितीत गणरायाचे स्वागत केले.
गणरायाच्या स्वागतासाठी मंगळवेढा शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. गणपती प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक असणारे साहित्य जुन्या पोलिस स्टेशनच्या परिसरामध्ये विक्रीस खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली.
ग्रामीण भागात टमटम, ट्रॅक्टर, रिक्षा व दुचाकीवरून मंगळवेढा शहरातून गणपती वाजत गाजत नेले जात सांगोला येथून गणपती मूर्ती आणल्या. पूजा आरास व आगमनापर्यंत चालणार असल्यामुळे ग्राहक प्रत्येक वस्तू पारखून घेत आहेत. घरोघरी गणपतीचे स्वागत करताना अनेकांनी त्यांचे व्हिडिओ काढून आमच्या पप्पांनी गणपती आणलाय’ या गाण्याचे टेटस ठेवले.
शहर व ग्रामीण भागात सार्वजनिक २०८ गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे परवाने दुपारपर्यंत वितरित करण्यात आले. ऑनलाइन संकेतस्थळ संथ रात्री उशिरापर्यंत परवाने देण्याचे काम सुरूच असल्याचे गुप्त वार्ता विभागाचे दिगंबर गेजगे यांनी सांगितले.
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एक पोलिस निरीक्षक, सात सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, ४१ पोलिस कर्मचारी, २५ होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज