मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील एका मुलीस हाताने व झाडूने मारहाण करून तीचा विनयभंग केल्याप्रकरणी एजाज काझी,खैरून काझी या दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,दि.११ रोजी दुपारी २.३० वा. मंगळवेढा शहरातील एका रोडवर यातील आरोपीने फिर्यादीच्या दिराच्या मुलीस हाताने व झाडूने मारहाण करून पिडीतेच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून शिवीगाळ केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
अधिक तपास पोलिस करीत आहेत.
————–
मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज