मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहर तालुक्यातून दोन दोन मुली एकाच दिवशी घरातून बेपत्ता झालाची त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनात नोंदवली आहे.
पहिल्या घटनेत 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ येथून एका 17 वर्षीय मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोनते तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार तिच्या पित्याने दाखल केली.
दुसऱ्या घटनेत 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास मारोळी येथील एका 15 वर्ष दहा महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला शाळेला जात असताना संशयित आरोपी परमेश्वर शास्त्री व नाशिक येथील श्याम नावाच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले अशी फिर्याद तिच्या पित्याने पोलिसात दाखल केली.
याप्रकरणी संशयित आरोपी विरुद्ध भा.द.वि 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
———–
मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज