mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरात पीडितेेच्या न्यायासाठी आज निषेध मूक मोर्चा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापुरात पीडितेेच्या न्यायासाठी आज निषेध मूक मोर्चा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

अल्पवयीन विद्यार्थिनीवर गँगरेप करणार्‍या नराधमांना पोलिसच पाठीशी घालत असल्याने तपासावर संशय व्यक्‍त होऊ लागल्याने पीडितेच्या न्यायासाठी शुक्रवार, 21 फेबु्रवारी रोजी सकाळी 11.30 वाजता साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून सर्वसमावेशक निषेध मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

खंदारे यांनी सांगितले की, अल्पवयीन विद्यार्थिनीवर 8 महिने अत्याचार केल्याचा गुन्हा योग्य त्या कलमान्वये पोलिसांत 11 फेबु्रवारी 2020 रोजी दाखल झाला आहे. फिर्याद दाखल करताना पीडित मुलीने 11 पेक्षा अधिक म्हणजेच 16 नराधमांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले असल्याची खात्रीलायक माहिती समजते.

परंतु, पोलिस मात्र हट्टाने दहाच आरोपी असल्याचे सांगत आहेत.पाच आरोपींची ओळख पोलिसच पटू देत नाहीत. रिमांड यादीमध्येसुद्धा पोलिसांनी आरोपींचा उल्‍लेख टोपण नावानेच केला आहे. आरोपी पोलिस रेकॉर्डवरील असल्याचे समजते. तरीही पोलिस सखोल चौकशी करत नाहीत. पोलिसांची तपासगती धीमी असल्याने पोलिस तपासावरच आता नागरिकांसह सर्वांकडून संशय व्यक्‍त होतो आहे. आरोपींची ओळख लपवणे, इतर आरोपींना अटक न करणे यावरून आरोपी पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांची मुले, नातेवाईक आहेत का, राजकीय पुढार्‍यांचे नातेवाईक आहेत का, असा संशय व्यक्‍त होत असून म्हणूनच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय येतो आहे. आरोपी रिक्षाचालक, सायबर मीडियातील सराईत व रॅकेट बनवून सामूहिकपणे गुन्हे करणारे आहेत.

यासह त्यांचा अनुषंगिक तपासही होत नाही. या प्रकरणावरून आरोपींचे सेक्स स्कँडल उघडकीस येण्याची शक्यता असल्याने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्याकडून चौकशी व्हावी. या प्रकरणाचा सखोल तपास होण्यासाठी तपास ‘सीबीआय’कडे वर्ग करावा. पीडितेला योग्य न्याय मिळण्यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि अ‍ॅड. असीम सरोदे अथवा अ‍ॅड. उज्वल निकम आदी निष्णांत वकिलांची नियुक्‍ती करून नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी आहे. यावेळी युवराज पवार, बाळासाहेब वाघमारे, सुरेश पाटोळे, लखन गायकवाड, विजय पोटफाडे, हिरा अडगळ, महादेव भोसले आदी उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपची गटबाजी

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपची गटबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा