मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्याचे कामगार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या (शुक्रवारी) दुपारी चार वाजता सोलापुरात येणार आहेत. केगाव येथील सिंहगड महाविद्यालयाच्या मैदानावर उद्यापासूपासून होणाऱ्या पुणे विभागाच्या महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस पालकमंत्री वळसे-पाटील सोलापुरात असणार आहेत.
पालकमंत्री वळसे-पाटील रात्री सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात मुक्काम करणार आहेत.
शनिवारी (ता. 22) सकाळी 9 ते 11 या वेळेत अभ्यागतांच्या भेटी, सोलापुरातील वोरोनोको प्राथमिक शाळेत राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने सुरू असलेल्या रुक्मिणी यात्रेला सकाळी 11 वाजता ते भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पालकमंत्री वळसे-पाटील जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेणार आहेत.
दोन ते अडीच सोलापूर महापालिका, अडीच ते तीन जिल्हा परिषद, तीन ते साडेतीन पोलिस आयुक्तालय, साडेतीन ते चार सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक, चार ते साडेचार कृषी व सहकार विभाग, सायंकाळी साडेचार ते पाच यावेळेत भीमा कालवा मंडळ व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाची ते बैठक घेणार आहेत. पाच ते सहा यावेळी जिल्ह्यातील उर्वरित विभाग व जिल्हा महसूल प्रशासनाचा ते आढावा घेणार आहेत. रात्री 10. 40 वाजता सिद्धेश्वर एक्स्प्रेसने पालकमंत्री वळसे-पाटील मुंबईला रवाना होणार आहेत. दीड दिवसाच्या या दौऱ्यामध्ये पालकमंत्री वळसे-पाटील यांनी जिल्ह्याच्या विकास कामांची आढावा बैठक घेणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज