मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
पुणे व मुंबई या शरात उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय सोयी अल्पदरात पंढरपूरात उपलब्ध करुन देणाऱ्या डॉ . प्रशांत निकम यांच्या निकम हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्ताने गुडघ्याच्या , खांद्यांच्या व खुब्यांच्या आजाराचे शिबीर आयोजित करण्यात आले असून हे शिबीर पूर्णपणे विनामुल्य आहे .
या शिबीरात गुडघे दुखी , गुडघ्यांची झिज , कुर्ची व गुडघ्यातील शिरा फाटणे , खांद्याचे आजार यावर उपचार केले जाणार असून या शिबिरात ज्वॉइंट रिप्लेसमेंट सर्जनकडून मोफत तपासणी , १५०० रूपये खर्च येणारी बी . एम . डी . मशिनद्वारे हाडाची घनता तपासणी मोफत करण्यात येणार असून युरीक अॅसिडची तपासणीही मोफत करण्यात येणार असून यामध्ये आवश्यकता भासली तर रुग्णांवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रीया व इतर खर्चीक तपासणीवर सवलत दिली जाणार आहे .
गुडघ्याचे सांधेरोपणासाठी १ लाख ५० हजार खर्च अपेक्षीत असताना ही शस्त्रक्रिया केवळ ९० हजारात होणार असू गुडघ्याची दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करण्यासाठी ५० हजारा ऐवजी केवळ ३० हजारात तरी या सर्व सवलतीचा लाभ गरजु रुग्णांनी घ्यावा व व्याधीमुक्त व्हावे , असे अवाहन डॉ . निकम यांनी केले . शिबीर दि . १ मार्च २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत निकम हॉस्पिटल , सरगम सिनेमा चौक पंढरपूर येथे होणार आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज