मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
‘प्रहार जनशक्ती पक्षा’चे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर शुक्रवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला होता. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या गोळीबारात पुंडकर गंभीर जखमी झाले होते. रात्रीपासून त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केलीय. तर घटनेच्या निषेधासाठी रविवारी अटोक बंदचं आवाहन करण्यात आलंय. या घटनेमुळे शहरात तणाव असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
गोळीबारात त्यांच्या पाठीला दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यात ते गंभीर जखमी झाले होते.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी देशी कट्ट्याचा वापर केला होता अशी माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप हल्ल्याचे कारण कळलेले नाही.
साधारण रात्री 11.30 वाजता त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना आमदार नितीन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावडे यांनी पुंडकर यांच्या प्रकृतीची पाहणी केली होती. मध्यरात्री पालकमंत्री बच्चू कडूदेखील रुग्णालयात दाखल झाले होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज