टीम मंगळवेढा टाईम्स । सध्या फेसबुक वर कपल चॅलेंज, सिंगल चॅलेंज, फॅमिली चॅलेंज, डॉटर चॅलेंज, नावाचे ट्रेंड सुरू झालेले आहेत.
एखादी नवी टूम निघाली की सर्वजण त्याचेच अनुकरण करतात. या आठवड्यात हा ट्रेंड खूपच जोरात चालू असून या ट्रेंड माध्यमातून प्रत्येक जण आपल्या कुटुंबातील मुलगी ,पत्नी यांचे फोटो घालून फेसबुकवर त्याचे प्रदर्शन करीत आहेत.
#challenge pic.twitter.com/3DId0qyIjn
— Solapur City Police (@solapurpolice) September 25, 2020
या माध्यमाद्वारे आपल्या कुटुंबाची इत्यंभूत माहिती सायबर गुन्हे,अनैतिक कृत्य करणाऱ्या व्यक्तींना मिळू शकतात आणि त्या या फोटोंचा गैरवापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे आपले मानसिक शारीरिक आणि आर्थिक नुकसान होऊ शकते,अशा ट्रेंडला बळी पडू नका कारण या फोटोचा गैरवापर केला जाऊ शकतो असे आवाहन सोलापूर आयुक्तालयाने केले आहे.
त्यामुळे सर्वांनी अशा बनावट ट्रेंडला बळी पडू नये सध्या अनेक गुप्तचोर या विविध प्रकारच्या घटनेवर लक्ष ठेऊन बसलेले असतात. आपल्या फोटो चा गैरवापर करून आर्थिक हानी पर्यंत आपले नुकसान होऊ शकेल त्यामुळे वेळीच सावध व्हा.
Don’t fall prey to the challenge trend on Facebook otherwise there will be losses; Appeal of Solapur Police
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज