मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । परीक्षेला जाताना एका विद्यार्थ्यांने आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत मित्रांचे दोन मोबाईल ठेवले होते . परीक्षा सुटल्यानंतर डिक्कीतून दोन्ही मोबाईल चोरीला गेल्याचे आढळून आले . याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .
विजापूर रोडवरील नेहरु नगर येथील जागृती विद्या मंदिरात दि . २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रथमेश राजू किरात ( वय १९ , रा . कल्याण नगर ) याने परीक्षा देण्यासाठी गेला . परीक्षेला जाताना त्याने पार्किंगमध्ये एमएच १३ , बीएस २४८२ या क्रमांकाची स्कूटी लावली होती . त्या स्कूटीच्या डिक्कीत अभिषेक शशिकांत हिप्परगी याचा आयफोन व आकाश महादेव सातपुते याच्याकडील रेडमी मोबाईल ठेवला होता .
परीक्षा सुटल्यानंतर गाडीच्या डिक्कीत दोन्ही मोबाईल आढळून आले नाहीत . कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरुन नेले होते .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज