मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । वसमत येथील एका डॉक्टर महिलेने आपल्या पतीविरोधातच चोरीची तक्रार दिली आहे. १ लाख ४० हजार रुपयांचे दागिने चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर पतीसह दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
वसमत शहर पोलीस ठाण्यात डॉ.मनीषा तम्मेवार यांनी ही तक्रार दिली. यात म्हटले की, घरातील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ४५ हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत.ही चोरी पती डॉ.चंद्रकांत तम्मेवार व सोमनाथ केंचे,(दोघे रा.वसमत) या दोघांनी केल्याचा त्यांचा आरोप आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. डॉक्टर पत्नीने डॉक्टर पतीविरोधात चोरीची तक्रार दिल्याने या प्रकरणाची शहरात उलट – सुलट चर्चा होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज