मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । प्राप्तिकर विभागाने गुरुवारी छत्तीसगढमध्ये राज्यातील प्रभावशाली आयएएस अधिकारी , उद्योजक , हॉटेल व्यावसायिकांससह छत्तीसगढ़ सरकारच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या.
उपरोक्त विभागाच्या ५०० अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी सकाळी दोनशेहून अधिक सीआरपीएफच्या जवानांसमवेत रायपूर , भिलाईसह राज्यातील चार जिलांत धाडसत्र सुरु केले. या धाडसत्राने राज्यात खळबळ उडाली आहे.
प्राप्तिकर विभागाने माजी मुख्य सचिव आणि रेराचे विद्यमान अध्यक्ष विवेक ढांड , आयएएस अधिकारी अनिल टुटजा , राजपूरचे महापौर एजाज ढेबर , मद्य व्यावसायिक पप्पू भाटिया , हॉटेल व्यावसायिक गुरुचरण सिंह होरा , सीए कमलेश जैन , डॉ . ए . फरिश्ता यांच्यासह मीनाक्षी ब्युटीपार्लर आणि टुटेजा अकादामीवर एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज