
मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । पंढरपूर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये वेळेवर सक्सेस का हजर राहत नाही असे विचारत तुझ्यामुळे केस लांब पडत आहे म्हणून चौघांनी मारहाण व शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद पांडुरंग विठोबा लवटे (रा. खुपसंगी) यांनी दिली.
ही घटना काल खुपसंगी ते आंधळगाव रोडवरील लवटेवस्ती येथे घडली असून यामध्ये दिनेश सिताराम लेंगरे, बिरा अण्णा लवटे, कुशाबा नारायण पडवळे, अंकुश उर्फ तुकाराम राजाराम पडोळे (सर्वजण रा. खुपसंगी) येथील असून त्यांनी फिर्यादीस पंढरपूर जिल्हा न्यायालयातील खटल्यात हजर का राहत नाही, केवळ तुझ्यामुळे केस लांबणीवर पडत आहे आणि नातेवाईकांच्या बाजूने साक्ष देण्यासाठी अंकुश पडवळे यांनी हातातील लोखंडी रॉडच्या साह्याने हातावर, पाठीवर मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली. तीन संशयित आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “ज्याप्रमाणे तुझ्या वडीलास मारले, त्याप्रमाणे तुलाही मारू,’अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












