मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.यूनिट नं ०३ चे संस्थापक चेअरमन प्रा.आ.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उदघटन भैरवनाथ शुगर वर्क्स लि.चे चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी १५१ जणांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्यांना आयोजकांच्या वतीने पाण्याचा ज्यार व चादर वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,यूनिट नं ०३ चे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांनी केले.यावेळी त्यांनी प्रा.आ.डॉ.तानाजीराव सावंत यांनी केलेल्या शिवजलक्रांती व इतर व वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कामाची माहिती दिली.
यावेळी जनरल मॅनेजर रविंद्र साळुखे,जनरल मॅनेजर (प्रो) अनिल पोरे,शिवसेना जिल्हा प्रमुख (पंढरपूर विभाग) संभाजीराजे शिंदे, शिवसेना पंढरपूर शहरप्रमुख रवी मुळे,रामचंद्र जाधव,श्रीपती माने,चंद्रकांत देवकर,इंद्रजीत पवार , तानाजी चव्हाण,शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण,ऊस पुरवठा अधिकारी कृष्णदेव लोंढे,ऊस पुरवठा अधिकारी जमीर काझी,एच आर मॅनेजर संजय राठोड, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, ईडीपी मॅनेजर नवनाथ चव्हाण, स्टोअर कीपर दत्तात्रय गाडे, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, फायनान्स अकौंटंट देवानंद पासले,अभिजीत पवार,प्रमोद भोसले,सुहास जाधव तसेच भैरवनाथ शुगरचे अधिकारी व कर्मचारी,शेतकरी,तोडणी – वाहतूक ठेकेदार तसेच लवंगी,सलगर,आसबेवाडी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज