mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पोलिसांचा दणका : मंगळवेढ्यात एक मॉल व चार दुकान चालकांविरुध्द गुन्हा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
पोलिसांचा दणका : मंगळवेढ्यात एक मॉल व चार दुकान चालकांविरुध्द गुन्हा


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूच्या धर्तीवर दुकाने शटरडाऊनचा आदेश देवूनही दुकाने सुरुच ठेवल्याने मंगळवेढयातील एका मॉलचा चालक व चार दुकानदार असे मिळून एकूण पाच जणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सध्या कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात होत असून लोकांची गर्दी होवू नये म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता पानटपरी,चहा कँटीन, हॉटेल,ढाबे व इतर दुकाने बंद करण्याचा आदेश दिला होता.१९ मार्च रोजी मंगळवेढयाचे पोलिस शहरातून गस्त घालत असताना पंढरपूर रोडवरील एस डी मार्ट हे मॉल चालू ठेवून विक्री करीत असताना आढळून आले.तसेच मार्केट यार्डमधील गाळयाजवळ एका दुकानामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस ठेवल्याचेही आढळून आले.त्याचबरोबर पंढरपूर रोडवर पाण्याच्या कॅनॉलला लागून असणाऱ्या दत्त हॉटेलजवळील दुकानातही एकजण तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी दुकान उघडे ठेवून बसला होता.

मंगळवेढा ते सांगोला रोडवर मोहिते पाटील कॉलेजजवळील एका पानटपरीमध्येही तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.तसेच नागणेवाडीमधील श्रीजल पाण्याच्या प्लँटशेजारी एका पानटपरीत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यासाठी ठेवल्याचे दिसून आल्याने पो.ना. राजकुमार ढोबळे व विकास क्षीरसागर यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी मॉल चालक शुभम सुरेश जाधव (वय २५,रा.उत्तर कसबा सोलापूर सध्या रा.मंगळवेढा), तुकाराम लक्ष्मण शिंदे (वय ६५ रा.वडर गल्ली), दादासाहेब सुखदेव दबडे (वय २२ रा.नागणेवाडी) , रामचंद्र महादेव पवार (वय ७९ रा.कारखाना रोड) , प्रकाश सोपान मुढे (वय ५२ रा.त्रिमुर्ती नगर, मंगळवेढा) या पाचजणांविरूध्द भा.दं.वि.स. कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या आदेशाने व पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राऊत,चालक हवालदार मनोज कुंभार,पो.ना.विकास क्षीरसागर,राजकुमार ढोबळे, पो.कॉ.अनिल दाते आदीनी केले.

जाहिरात :

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
चीननंतर हे देश सापडलेत कोरोनाच्या विळख्यात

चीननंतर हे देश सापडलेत कोरोनाच्या विळख्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा