मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणी अॅड.सविता शिंदे यांनी केली आहे.बुधवारपासून सामान्य नागरिकांना पेट्रोल,डिझेल मिळणार नाही,असे जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अडचणीचा निर्माण झाला आहे . काही निर्बंध घालून आठवड्यातून ठराविक प्रमाणात तरी शेतकऱ्यांना पेट्रोल,डिझेल मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करमाळ्याचे तहसीलदार समीर माने , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार , अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन – भुजबळ , गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे त्यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज