लंडन । मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचे वृत्त आहे. आपल्याला काही लक्षणे जाणवत असून स्वत : ला विलगीकरणात ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याआधी ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती.
शाही राजघराण्यातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण झाल्याने गांभीर्य वाढले आहे. जॉन्सन यांची तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज