मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आज 8 ने वाढून 153 झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद भिरकर यांनी बुधवारी दिली. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
काल मंगळवारी रात्री पर्यंत सोलापुरातील बाधितांची संख्या 145 होती. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. सोलापुरात आयसोलेशन वार्डातील असणाऱ्या रुग्णांपैकी आत्तापर्यंत 2633 जणांची कोरोना स्वॅब चाचणी घेण्यात आली यापैकी 2369 अहवाल प्राप्त झाले आहेत.
यात 2216 निगेटिव्ह , तर 153 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. जिल्हा प्रशासनाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की , आज एका दिवसात सोलापुरात 197 चाचणी अहवाल आले . यात 189 निगेटिव्ह तर 8 पॉझिटिव्ह आले आहेत . यामध्ये 8 पुरुष असून 1 मयत आहे . एकता नगर परिसरात राहणारा 57 वर्षे वयाचा पुरुष 5 मे रोजी मरण पावला.
आज सदर बाजार लष्कर येथील दोन पुरुष साईबाबा चौक येथील एक पुरुष एकता नगर सोलापूर येथील एक पुरुष मोदी भागातील दोन पुरुष राहुल गांधी झोपडपट्टी येथील एक पुरुष सिद्धेश्वर पेठ येथील एक पुरुषाचा समावेश आजच्या बाधित व्यक्तींमध्ये होतोय.
——————
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज