mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Good News : आजपासून एसटीची मोफत सेवा; वाचा कुणाला आणि कुठे प्रवास करता येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
Good News : आजपासून एसटीची मोफत सेवा; वाचा कुणाला आणि कुठे प्रवास करता येणार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना मोफत घरी पोहोचवण्यासाठी मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 20 कोटींची मदत जाहीर केली. नागरिकांसाठी आज गुरुवारपासून एकूण 10 हजार बसगाड्या सोडण्यात येतील. या माहितीला परिवहन मंत्री अनिल परब यांनी दुजोरा दिला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्याठी राज्य सरकारने 23 मार्चपासून लॉकडाऊन जारी केला. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण व अन्य कारणांसाठी गेलेले नागरिक राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत अडकून पडले. एसटी महामंडळाने राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना नुकतेच महाराष्ट्रात परत आणले. आता राज्य सरकारने वेगवेगळ्या जिल्ह्यांत अडकून पडलेल्या नागरिकांना घरी पोहोचवण्यासाठी मोफत एसटी बसगाड्यांची व्यवस्था करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.

या एसटी बसगाड्यांमधील प्रवाशांची संख्या, भाडे, बस क्रमांक, आगार याबाबतची माहिती मूळ आगारात नोंदवावी, असा आदेश एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिला आहे.

काही जिल्ह्यांमध्ये एसटीला प्रवेशबंदी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी एसटी बसला प्रवेशबंदी केली आहे. जिल्हा, तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षांनी तशा सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

महामंडळात समन्वयाचा अभाव?

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोफत 10 हजार एसटी बसगाड्या सोडण्याची घोषणा केली असून, परिवहन मंत्री अनिल परब यांनीही दुजोरा दिला आहे. परंतु, एसटी महामंडळाकडून बुधवारी रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे महामंडळात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले.

एसटी अधिकाऱ्यांना सूचना

प्रवास सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांना माहिती देण्यासाठी आगार, विभागीय पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन करा.नियंत्रण कक्ष, विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी व आगार व्यवस्थापक यांचे भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिद्ध करा.महसूल पोलिस विभाग व परिवहन अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून प्रवासासंदर्भात नोंदवलेल्या मागणीची माहिती घ्या.

प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी सरकारने नेमलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र व वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.नागरिकांनी सादर केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून प्रवासाच्या मार्गाबाबतची माहिती घ्यावी.प्रवासाच्या मार्गाची माहिती मिळाल्यानंतर सोडण्यात येणाऱ्या बसगाड्यांसाठी प्रवाशांचे गट करावे.

नागरिकांना बस सुटण्याचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण अशाच प्रवासाला परवानगी द्यावी; मधल्या थांब्यावर उतरता येणार नाही, अशी स्पष्ट कल्पना द्यावी.प्रवाशांचे गट तयार केल्यानंतर बसगाड्या सोडाव्यात; संबंधित आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना पूर्वसूचना द्यावी.प्रवास सुरू करण्यापूर्वी बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण करावे.

प्रवासातील दक्षता

नागरिकांनी संपूर्ण प्रवासात मास्क वापरणे अनिवार्य; बसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत.प्रवाशांना बसमध्ये घेताना सरकारने प्रवासाला परवानगी दिल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड अथवा अधिकृत ओळखपत्राची पडताळणी करावी.बसमध्ये दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर ठेवण्याबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे; एका बाकावर एकच प्रवासी बसेल, याची काळजी घ्यावी.बसमधील प्रवाशांची तीन प्रतींमध्ये यादी करावी.

प्रवास पूर्ण झाल्यानंतर

प्रवासाच्या अंतिम ठिकाणी आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख यांनी तेथील सरकारी नोडल ऑफिसरशी संपर्क साधून येणाऱ्या बसबाबत माहिती द्यावी.बस अंतिम ठिकाणी आल्यानंतर नोडल ऑफिसर, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा; बसमधून आलेल्या नागरिकांना नोडल ऑफिसरच्या ताब्यात द्यावे.

प्रवासी घेऊन येणारी बस परत पाठवायची असल्याने व त्याबाबतची सूचना आधीच मिळणार असल्याने संबंधित आगार व्यवस्थापकांनी त्याच मार्गावरून प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी परतीच्या प्रवासाची व्यवस्था करावी.परतीच्या प्रवासासाठी रवाना करण्यापूर्वी बसगाड्यांचे पुन्हा निर्जंतुकीकरण करावे.

सोईसुविधा

लांब पल्ल्याच्या मार्गांवरील बसगाड्या नैसर्गिक विधी, चहा, नाश्ता, जेवण यासाठी फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानकांतच थांबवाव्यात. बस मार्गस्थ करण्यापूर्वी यादीप्रमाणे सर्व प्रवासी परत आल्याची खात्री करावी.

बसगाड्यांसाठी पुरेशा इंधनाची व्यवस्था करावी; लांब पल्ल्याच्या बसगाड्यांना आवश्यकतेनुसार मार्गातील आगारात इंधन उपलब्ध करून द्यावे.

प्रवासासाठी सुस्थितील बसगाड्या द्याव्या; मार्गात बिघाड झाल्यास बसची दुरुस्ती त्वरित करून द्यावी; आवश्यकता भासल्यास पर्यायी बसची व्यवस्था करावी.

ऑनलाईन बुकिंग :

एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन बुकिंग करता येईल. त्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात येणार आहे; मात्र त्याबाबत परिवहन मंत्र्यांनी अद्याप घोषणा केलेली नाही. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी घरबसल्या बुकिंगची सुविधा दिली जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

————————–

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
दहावी व बारावी परीक्षेचा निकाल ‘या’ महिन्यात लागण्याची शक्यता?

दहावी व बारावी परीक्षेचा निकाल 'या' महिन्यात लागण्याची शक्यता?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा ३१५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मोठा दिलासा; दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

April 21, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

रक्त नात्यातील जमीन वाटणी पूर्णपणे मोफत; सातबारावरील हक्कासाठी शुल्क भरावे लागणार नाही; नेमका बदल असा, आधी काय आणि आता काय?

April 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

लेकींच्या शिक्षणाची चिंता मिटली! राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ शुल्कही होणार १०० टक्के माफ

April 21, 2026
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे डॉक्टर एसीबीच्या कचाट्यात; मंगळवेढ्यात खळबळ

April 20, 2026
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

महिलांनो सावधान! ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड

April 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा