मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । साथीचे रोग नियंत्रण कायदा कलम लागू असतानाही मंगळवेढा शहरात विना परवाना अन्य जिल्हयातून येवून प्रवेश केल्याप्रकरणी २० जणांवर मंगळवेढा पोलिसांत गुन्हे दाखल केल्याने बाहेरून येणाऱ्या प्रवासी वर्गात खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्हयात कोरोना साथीने दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत.याला अटकाव घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यात बाहेरून विना परवाना येणाऱ्या व्यक्तींना प्रवेश नाकारला असतानाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून दि.१४ रोजी मंगळवेढा नगरपरिषद हद्द व ग्रामीण भागात सहदेव परमेश्वर चव्हाण (वय २०, रा.हुन्नूर),सुनिल तानाजी चव्हाण (वय २१, रा.हुन्नूर) ,अनिल आबा गेजगे ( वय ३५ रा.मानेवाडी ) , मुक्ता अनिल गेजगे (वय ३० रा.मानेवाडी ) , जालिंदर दादाराव इंगोले (वय ३५ रा.मानेवाडी) , स्वानंद अंबादास कसबे ( वय २७ , रा.खडकी ) , मारुती कृष्णा चोपडे ( वय ५५ रा.पडोळकरवाडी ) , राजू कला ऐवळे ( वय ३० , रा.हुन्नूर ) , शिवानंद हणमंत चौगुले ( वय २० ,रा.हुन्नूर ) , पल्लवी महादेव पाटील ( वय ३२ रा . रहाटेवाडी ) , मदन भाऊराव पाटील ( वय ३० , रा.रहाटेवाडी ) , नामदेव साटव्वा शिंदे ( वय ७५ , रा.निंबोणी ) , व्यंकटेश लक्ष्मण शिंदे ( वय १८ रा . निंबोणी ),
भागाबाई नामदेव शिंदे ( वय ६० रा.निंबोणी ) , सुभाष लालसिंग पवार ( वय ४२ रा.बालाजी नगर ) , संगिता सुभाष पवार ( वय ३५ रा.बालाजीनगर ) , वसंत दत्तू लेंडवे ( वय ५७ रा.आंधळगांव ) , आशा वसंत लेंडवे ( वय ५५ लेंडवे चिंचाळे ) , लखन महादेव बनसोडे ( वय २ ९ , रा.देगांव ) , पुजा लखन बनसोडे ( वय २२ रा.देगांव ) आदी २० जण मुंबई , इचलकरंजी , गोवा , कोल्हापूर , पुणे , बेळगांव , तासगांव , सांगली , डोणगांव , हडलसंग – विजापूर , जत आदी ठिकाणावरून आले आहेत.
याची फिर्याद पोलिस नाईक राजकुमार ढोबळे यांनी दिल्यावर वरील २० जणांविरूध्द कलम १८८ , २६ ९ , २७० , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तसेच २००५ चे कलम ५१ ब साथीचे रोग आदी १८९७ कलम २ , ३ , ४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस करीत आहेत.
——————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज