समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स कोरोना विषाणूमुळे संसर्गजन्य महामारी संकट काळात गेले दोन महिने देशात आणि राज्यात लॉक डाऊन असल्यामुळे आणि गोरगरीब मजुरांना काम नसल्याने रोजचे जगणे मुश्किल झालेले आहे. या संकट काळात एक सामाजिक बांधिलकी व कर्तव्य म्हणून मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आज छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढा शहरातील गोरगरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी शहरातील नागणेवाडी, शनिवार पेठ, नवरंग चौक, बस स्थानक जवळील परिसर, शहरालगत दामाजी कॉलेज जवळील उजनी वसाहत येथील गरीब गरजू कुटुंबांना शिक्षक पतसंस्था कार्यालयासमोर तसेच त्यांच्या वसाहती मध्ये जाऊन एकूण ३१ जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले. या जीवनावश्यक कीट मध्ये गहू, पोहे, शेंगदाणे,हरभरा डाळ, मसूर डाळ, शेंगतेल, साखर, चहा, धुण्याचा साबण, अंघोळीसाठी साबण, हँडवाँश, मीठ आदि वस्तूंचा समावेश होता.
यावेळी राज्य संघाचे उपाध्यक्ष तथा जिल्हा सोसायटीचे संचालक संजय चेळेकर, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी तानगावडे, सरचिटणीस राजेंद्र केदार, उपाध्यक्ष अण्णासाहेब मोहिते, नगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष भारत शिंदे यांचेसह शिक्षक संघाचे जेष्ठ सल्लागार अशोक बिराजदार, गुरूलिंग स्वामी, रमेश दुधाळ, विष्णू आसबे, प्रसिद्धीप्रमुख नागेशकुमार धनवे तसेच मोहनराव लेंडवे, श्रीरंग आवळेकर, संजय माळी, उषाताई कोष्टी मॅडम आदि पदाधिकारी उपस्थित होते.
——————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज