मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । तुम्हाला दहावी आणि बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे का ? मग, जरा इकडे लक्ष द्या. कोरोनाचा वाढता संसर्गामुळे या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीमध्येही अनेक अडचणी येत आहेत. परिणामी यंदा निकाल उशीरा लागण्याची चिन्हे आहेत. बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, तर दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागेल, असे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरीही दुसरीकडे मात्र विद्यार्थी आणि पालकांना दहावी, बारावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. या निकालासंदर्भातील सोशल मीडियाद्वारे उलट-सुलट माहिती नागरिकांपर्यंत पोचविली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मात्र, शालेय शिक्षण मंत्र्यांनी निकालाबाबत खुलासा केल्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्याथी आणि पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.
“साधारणत: दरवर्षी दहावीचा निकाल 10 जूनपर्यंत, तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी लागतो. परंतु यंदा उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण होऊन निकाल लावण्यासाठी आणखी किमान दीड ते दोन महिने लागण्याची शक्यता आहे.”, असे गायकवाड यांनी सांगितले.
दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना उत्तरपत्रिका ने-आण करताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या शिक्षकांना प्रवासाची परवानगी द्यावी, असे स्थानिक प्रशासन, महापालिका, जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आल्याचेही गायकवाड यांनी नमूद केले.
“लॉकडाऊनमुळे दहावी आणि बारावीच्या निकालाला काहीसा उशिरा होणार आहे. परंतु नागरिकांना सध्या निकालाच्या तारखांबाबत पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. निकालाबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने अधिकृतरित्या माहिती देण्यात येईल.”, असे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे येणाऱ्या अडचणी :
– शिक्षकांपर्यंत उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वेळेत न पोचणे
– तपासलेल्या उत्तरपत्रिका संबंधित नियंत्रकांपर्यंत पोचविण्यात अडचणी
– संबंधित शिक्षकांना प्रवासात अडथळे
– शेवटच्या पेपरच्या उत्तरपत्रिका शिक्षकांपर्यंत आता पोचत आहेत.
—————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज