टीम मंगळवेढा टाईम्स । सांगोला शहरात मित्राने मोबाईलच्या कारणावरून झोपेत असताना खून केल्याची घटना ताजी असताना आज पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. डोक्यात दगड घालून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मृत्यू झालेल्या इसमाचे नाव संतोष सुरेश कपणे असे आहे.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली इसमाचा खून झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी भेट दिली.
संतोष सुरेश कपणे (वय ३१, रा. सरकोली, ता. पंढरपूर) हे घराच्या बाहेर झोपले असताना त्यांच्या डोक्यामध्ये अज्ञात इसमाने दगड मारला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
——————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज