
टीम मंगळवेढा टाईम्स । नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतिनाथ महाराजांचा खून झाला. मठाच्या बाथरूममध्ये आणखी एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे महाराजांचा निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह मारेकऱ्यांनी आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेने भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
नागठाणा मठात आणखी एक मृतदेह
नागठाणा मठातील शौचालयात आखणी एक मृतदेह आढळला आहे. चिंचाळा गावातील भगवान शिंदे यांचा हा मृतदेह आहे. शिंदे हे मठापतीचे सेवेकरी होते. सेवेकरीचाही खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
मिळालेली माहिती अशी की, गावातीलच एका माथेफिरू तरुणाने चोरीच्या उद्देशाने हे कृत्य केले. महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटल्याचं बोललं जात आहे. महाराजांचा गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली आहे. महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना मठाशेजारी राहणारे नागरिकांना जाग आली असता आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. महाराजांचा मृतदेह उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आली आहे. याठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












